शशिम कांबळे
तालुका प्रतिनिधी राळेगाव
यवतमाळ जिल्ह्यातील राळेगाव तालुका अंतर्गत येत असलेल्या झुल्लर येथे शैक्षणिक सत्र माहे मार्च मधील खैरी केंद्रातील शिक्षण परिषद जिल्हा परिषद प्राथमिक शाळा झुल्लर ,पंचायत समिती राळेगाव येथे दिनांक २८- ०३ -२०२५ रोज शुक्रवारला वेळ १० ते २ या वेळेत पार पडली . ही शिक्षण परिषदेच्या अध्यक्षस्थानी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष बावणे तर प्रमुख पाहुणे म्हणून गटशिक्षणाधिकारी पं . स . राळेगाव राजू काकडे, खुशाल वानखेडे अध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती केंद्र शाळा खैरी, सुरेश कुंभलकर केंद्रप्रमुख तथा मुख्याध्यापक केंद्र शाळा खैरी , देऊळकर सर उच्च श्रेणी मुख्याध्यापक दहेगाव त्यांच्या उपस्थितीत मंगेश कोवळे सहायक शिक्षक मंगी , वेट्टी मॅडम पिंपरी शाळा यांचे मार्गदर्शनात पार पडली. या कार्यक्रमाची सुरुवात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक खैरी केंद्राचे केंद्र प्रमुख तसेच खैरी शाळेचे मुख्याध्यापक सुरेश कुंभलकर यांनी केले शिक्षण परिषद मध्ये सकाळी १०.०० ते १०.३० उपस्थिती नोंदणी तासिका पहिली १०.३० ते ११.०० स्पर्धा परीक्षा पूर्व तयारी मार्गदर्शन कु. वेट्टी मॅडम पिंपरी शाळा
तासिका दुसरी ~११ ते ११.४५ निपुण महाराष्ट्र जी. आर. वाचन व कृती कार्यक्रम अध्ययन स्तर निश्चिती मार्गदर्शन कोवळे सर. प्राथमिकशाळा, मंगी तासिका तिसरी वेळ ११.४५ते १२.३०SQAAF मानके भरणे व शाळा पूर्व तयारी उन्हाळी वर्ग सुरू करणे तसेच चौथ्या तासिकेत वेळ १२.४५ ते १.३० प्रशासकिय माहिती कुंभलकर सर यांनी दिली
१.३० ते २.०० वाजेपर्यंत खैरी केंद्रातील पिंपरी या शाळेचे तीन विद्यार्थी नवोदय परीक्षेमध्ये प्राविण्य प्राप्त केले त्यांचा सत्कार गटशिक्षणाधिकारी राजू काकडे खैरी केंद्र शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष खुशाल वानखेडे यांचे हस्ते करण्यात आला. तसेच सेवानिवृत्त शिक्षक श्री दिलीप मांदाडे व चिंतामण धाडवे सर यांचा सुद्धा सत्कार करण्यात आला. या शिक्षण परिषदेला खैरी केंद्रातील सर्व जिल्हा परिषद शाळांचे मुख्याध्यापक तथा शिक्षक वृंद उपस्थित होते या शिक्षण परिषदेच्या यशस्वीतेसाठी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा झुल्लर च्या प्रभारी मुख्याध्यापिका रजनी वानखेडे (भगत)मॅडम यांनी विशेष परिश्रम घेतले . या शिक्षण परिषदेचे आभार प्रदर्शन केंद्रप्रमुख कुंभलकर सर यांनी केले.


