दिपक केसराळीकर
उपजिल्हा प्रतिनिधी नांदेड
अध्ययन संस्था मुंबई व संस्कृती सवंर्धन मंडळ, सगरोळी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित अध्ययन संपर्क गणित विज्ञान मंडळाची प्रश्नमंजुषा स्पर्धा–2025 श्री छ.शिवाजी हायस्कूल, सगरोळी येथे घेण्यात आली. यामध्ये लिट्ल फ्लॉवर कॉन्व्हेन्ट इंग्रजी माध्यम स्कूल बिलोली या शाळेच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळवीले आहे. यामध्ये प्राथमिक गटातून कु.मटके सर्वमंगला मारोती व कु.बाळके ऋतुजा सुधाकर यांच्या गटाने प्रथम क्रमांक मिळवला तर माध्यमिक गटातून कु.रचना महेश मठवाले व कु.नशरा रोजमीन नैमुला यांच्या गटाने द्वितीय क्रमांक मिळवला. याबद्दल आयोजकांच्या वतीने प्रमाणपत्र ट्रॉफी व बक्षीस देऊन गौरविण्यात आले.सर्व विजयी स्पर्धकांचे शाळेच्या प्राचार्या सौ.के.रजनी राणी यांच्यासह मुख्याध्यापक सर्व शिक्षक शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी कौतुक केले आहे.या स्पर्धेसाठी सात शाळा सहभागी झाल्या होत्या.सर्वच शाळांतील विद्यार्थ्यानी अध्ययन संपर्क मासिकाचा अभ्यास करून छान प्रतिसाद दिला.


