रवि राठोड
ग्रामीण प्रतिनिधी वाकान.
महागांव : तालुक्यात वाढत्या उष्णतेमुळे कहर केला असुन जिव कसावित होत आहे.ऐन मार्च महिन्याच्या सुरुवातीलाच उन्हाची तीव्रता वाढली असून उष्णतेच्या तप्त झळा जानवत असल्याने नदी,नाले,व जंगलातील पाणवठे पाण्याअभावी कोरडे पडल्याने वन प्राण्यांच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे.महागांव वनपरिक्षेत्रातील जंगलात पाण्याअभावी कोरडे पडलेले पाणवठे वनविभागाच्या प्रयत्नाने पाण्याने तुडुंब भरले आहे.त्यामुळे वनवन भटकंती करणाऱ्या वन्यप्राण्यांचे प्रश्न सुटले आहेत.वन विभागाला शासनाकडून कुठलाही निधी प्राप्त न होता स्वखर्चाने वन अधिकारी व वनपाल यांनी पाण्याची व्यवस्था केली आहे महागांव वनपरिक्षेत्र अंतर्गत मोठ्या प्रमाणात जंगल क्षेत्र यात विविध प्रकारचे वन्यप्राणी मुक्तपणे संचार करीत आहे.प्रान्यांना पिण्याचे पाणी उपलब्ध व्हावे या हेतूने जंगलात पाणवठे निर्माण करण्यात आले आहे.परंतु निसर्गाच्या लहरीपणामुळे कधी अतिवृष्टी तर कधी कोरडा दुष्काळ यांचाही फटका वन्यप्राण्यांना बसत आहे सध्या उन्हाळा सुरू झाल्याने जंगलातील पाणवठे कोरडे पडल्याने वन्य प्राणी सैरावैरा धावत असल्याचे चित्र दिसत आहे. तर वन्य प्राण्यांना पाण्याची सोय उपलब्ध व्हावी म्हणून वनविभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी देवेंद्र मुनेस्वर वनपाल जाधव यांनी स्वखर्चाने पाण्याचे टॅकंर लावुन उत्तर दगडथर बिट मधील कक्ष क्र.४४२ मध्ये नविन बांधण्यात आलेल्या नियत क्षेत्रातील पाणवठ्यामध्ये वन प्राण्यांसाठी टॅकंरने पाणी टाकून तुडुंब भरन्यात आले त्यामुळे वन प्राण्यांच्या पीन्याच्या पाण्याची सुविधा आता जंगलातच उपलब्ध झाली आहे.शासनाकडुन कुठलाच निधी प्राण्यांच्या सुविधेसाठी उपलब्ध नसतांना वन अधिकारी वनपाल यांनी प्राण्यांचे हित जोपासुन वन प्राण्यांसाठी पाण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे.त्यामुळे वन्यप्राणी गावाकडे न भटकता जंगलातच मुक्त संचार करत असल्याचे चित्र दिसून येत आहे.


