रवि राठोड
ग्रामीण प्रतिनिधी वाकान.
वाकान : महागांव तालुक्यातील वाकान येथील जगदंबा माता मंदिराचे एक वर्षापासून बांधकाम सुरू होते.या बांधकामा दरम्यान गावातील व बाहेर गावातील दानविरांनी आप आपल्या परीने आर्थिक मदत करुन मंदीर बांधकामासाठी देणगीचे हातभार लाउन मदतीचे सहकार्य केले आहे.अखेर बांधकाम पुर्णत्वास आले असून चैत्र नवरात्र व गुढीपाडवा नववर्षाच्या शुभ प्रसंगी वाकान येथील वार्ड क्रमांक तिनं मधील जगदंबा माता मंदिराचे कलश रोहनाचे कार्यक्रम यशस्वीरीत्या व उत्सव पुर्वक पार पडले यावेळी पोहरादेवी येथील संत पंडित आवर्जून उपस्थित होते त्यांच्या शुभ हस्ते हा कलश रोहनाचा कार्यक्रम पार पडला असुन वाकान येथील संपुर्ण विवाहित मुली ज्यांचे लग्न बाहेर गावी झाले आहेत त्यांना महाप्रसादाचे स्वादिष्ट भोजन देऊन साडी चोळीचे वाटप करण्यात आले गेल्या पन्नास वर्षांपासून असलेले जगदंबा मातेचे मंदिर यांचे बांधकाम करून कलश रोहनाचे कार्यक्रम संपुर्ण गावकऱ्यांच्या सहकार्याने यशस्वीरीत्या पार पडले.चैत्र नवरात्रीला व गुढीपाडवा या सनाला अध्यात्मिक आणि सांस्कृतिक महत्त्व आहे.आणी चैत्र महिन्याच्या मार्च/एप्रिल सुरूवातीलाच साजरा केला जातो या वर्षी ३० मार्च २०२५ पासुन सुरु झाल्याने कलश रोहनाचे कार्यक्रम योग्य वेळेच्या नुसार नियोजन करण्यात आले आहे.या जगदंबा माता मंदिराच्या कार्यक्रम सोहळ्याला बाहेर गावातील विषेश अतीथींना आमंत्रित करण्यात आले असून संपूर्ण गावांमध्ये आमंत्रित करून महाप्रसादाचे कार्यक्रम पार पडले यावेळी बाहेर गावातील आमंत्रित मंडळी सह गावातील महिला पुरुष नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


