पवनकुमार भोकरे
तालुका प्रतिनिधी, पाटोदा
पाटोदा : अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास महामंडळाच्या विविध योजनांचा लाभ घेऊन तरुण बेरोजगारांनी स्वतःचा उद्योग-धंदा सुरू करावा, असे आवाहन भागवत (राजे) भोसले, सामाजिक कार्यकर्ता यांनी केले आहे.भागवत (राजे) भोसले यांनी युवकांना विविध योजनेचा लाभ कसा होईल व उद्योजक बनण्याची सोपी पद्धत याबाबत मार्गदर्शन केले. त्यांनी सांगितले की, महामंडळाच्या विविध योजनांच्या माध्यमातून तरुणांना स्वावलंबी बनण्याची मोठी संधी उपलब्ध आहे. यामुळे बेरोजगारीवर मात करता येईल आणि आर्थिक स्थैर्य निर्माण होईल.युवा तरुणांनी महामंडळाच्या योजनांबाबत सविस्तर माहिती घेतली. तसेच, आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया आणि कर्जविषयक माहिती जाणून घेतली. या वेळी उपस्थित मान्यवरांनीही युवकांना उद्योग व्यवसाय सुरू करण्यासाठी प्रोत्साहन दिले.या कार्यक्रमाला अनेक तरुण तसेच सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते. अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास महामंडळाच्या मदतीने युवकांनी स्वतःचा व्यवसाय सुरू करून आत्मनिर्भर होण्याचा संकल्प केला.


