स्वरूप गिरमकर
तालुका प्रतिनिधी शिरूर
शिरूर : उरळगाव (ता. शिरूर) येथील पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या न्यू इंग्लिश स्कूल विद्यालयात भारतीय मानक ब्युरो (बी आय एस )पुणे शाखेच्या अंतर्गत बी आय एस मार्क पाहूनच वस्तूची खरेदी करण्याविषयी विद्यार्थिनींनी नाटिकेतून आज शनिवारी (ता.२९)जनजागृती करून बी आय एसच्या दुसऱ्या उपक्रमाच्या पोस्टर प्रेसेंटेशन ची स्पर्धा घेऊन प्रथम तीन क्रमांकाच्या स्पर्धकांना गौरविण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक एच. व्ही. नरवडे होते. कार्यक्रमाचे उद्घाटन शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष भीमराव कुदळे यांनी केले. सरस्वती प्रतिमेच्या पूजनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. त्यानंतर बीआयएसचे मानक गीत सादर करून प्रतिज्ञा घेण्यात आली. विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. बीआय एसच्या मेंटर हसीना जखाते यांनी पोस्टर प्रेजेंटेशन विषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले तर विज्ञान शिक्षिका रेश्मा धरणे यांनी मानकाची विद्यार्थ्यांना माहिती दिली. विद्यालयातील विद्यार्थ्यांनी बी आय एस चा मार्क पाहूनच वस्तूची खरेदी करण्याचे नाटिकेतून जनजागृती केली. विद्यार्थ्यांनी त्यांच्या कल्पनेच्या सहाय्याने बी आय एस प्रमाणित केलेल्या विविध चिन्हाचा वापर करून छान असे पोस्टर काढली. प्रथम क्र. तनिष्का सात्रस, कार्तिकी सात्रस. द्वितीय क्रमांक :सायरी जांभळकर, ज्ञानेश्वरी कोळपे. तृतीय क्रमांक: प्रणव कुदळे ,आर्यन जांभळकर, उत्तेजनार्थ गौरी गिरी, गायत्री पाचुंदकर या विद्यार्थ्यांना रोख रक्कम बक्षीस म्हणून देऊन गौरवण्यात आले. याप्रसंगी बी.बी. दौंडकर, के.डी. मिसाळ, कैलास खंडागळे,आनंद करडे, विक्रम सस्ते ,स्वाती सात्रस, गोवर्धन घायतडक,अभिलाष पिसाळ ,भानुदास शिंदे,वर्षा धुमाळ,कांचन ओव्हाळ, विक्रम पाचुंदकार आदी उपस्थित होते. उपस्थितांचे अविनाश लोखंडे यांनी आभार मानले.


