मारोती सुर्यवंशी
तालुका प्रतिनिधी नायगाव
गेली 25 /30 वर्षा पासून भारतीय जनता पार्टीमध्ये अविरतपणे उल्लेखनीय कार्य करणारे नायगाव विधानसभा मतदार संघाचे युवा नेते श्रावण पाटील भिलवंडे यांचें भाजपा मध्ये “आच्छे दिन” येणारच कारण आम्ही त्यांच्या पाठीशी खंबीरपणे ताकद उभी करू असे मत महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा राज्यसभा खासदार अशोकराव चव्हाण यांनी व्यक्त केले आज दि.२९ रोजी माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोकराव चव्हाण हे बिलोली तालुक्यातील सगरोळी येथे जन्मशताब्दी सोहळ्यानिमित्त गेले होते. सगरोळी येथून नांदेड ला परत जाताना नरसी चौकात नायगाव पंचायत समितीचे माजी सभापती श्रावण पाटील भिलवंडे यांनी त्यांचं ढोल ताशाच्या गजरात व क्रेनच्या सहाय्याने भला मोठा हार टाकून जंगी स्वागत केले या नंतर अशोकराव चव्हाण यांनी श्रावण भिलवंडे यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली असता श्रावण पा. भिलवंडे यांच्या वतीने पवित्र ग्रंथ गिता व शाल श्रीफळ पुष्पहार घालून यथोचित सन्मान करण्यात आला. याप्रसंगी देगलूर बिलोली विधानसभा मतदारसंघाचे आमदार जितेश अंतापूरकर ,नरेंद्र चव्हाण, माजी सभापती किशोर स्वामी, जिल्हाध्यक्ष संतुकराव हंबर्डे, शेतकरी नेते मारोतराव कवळे गुरुजी, बालाजी बच्चेवार, भाजपा प्रवक्ते संतोष पांडागळे, शंकर कल्याण, आदींची प्रमुख उपस्थिती होती . यावेळी भाजपाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, पत्रकारांसोबत मन मोकळेपणे चर्चा केली. यावेळी बोलत असताना अशोकराव चव्हाण म्हणाले की, भारतीय जनता पार्टीमध्ये कार्य करत असताना मी महायुतीचा धर्म पाळणार असून आमच्या कार्यकर्त्यांना बळ देण्याचे कार्य करणार आहे असे सांगत या भागातील रस्त्याचे प्रश्न, वंदे भारत रेल्वेचा प्रश्न यासह आदी प्रश्नावर दिलखुलास चर्चा केली. याप्रसंगी तुळजाभवानी जिनिंग प्रेसिंग सोसायटी व नरसी सेवा सहकारी सोसायटी च्या सदस्यांचे अशोकराव चव्हाण यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. याप्रसंगी नरसी नगरीचे पोलीस पाटील इब्राहिम बेग पटेल,माजी सरपंच व्यंकटराव कोकणे, मारोती भिलवंडे, माजी सरपंच गजानन भिलवंडे, गंगाधर वडगावे, धनराज शिरोळे, वसंत कस्तुरे, बालाजी चिंतावार, साईनाथ अक्कमवाड, हनमंत मिसे, अलीम बेग पटेल, त्र्यंबक डाके, भगवान चव्हाण, व्यंकट नागेश्वर, मारुती बुके, आनंद पाटील बावणे, सय्यद खलील सेठ, राम खनपटे,जनाजी खनपटे रमेश वासरे,सह भाजपाचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


