(दिग्रस पंचायत समितीचे गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन.)
राजपाल बनसोड तालुका प्रतिनिधी दिग्रस
दिग्रस : गेल्या १५ वर्षा पासून दिग्रस पंचायत समिती कार्यालयाचे गेट समोर दिव्यांगाचे कार्यालय सुरु केले होते. या कार्यालया मार्फत दिग्रस तालुक्यातील सर्व दिव्यांगाना विविध योजनेचा लाभ याच कार्यालया मार्फत देण्यात येत होते. परंतू शासनाद्वारे दिग्रस शहरामध्ये नगर पालीके मार्फत अतिक्रमण मोहीम राबविण्यात आली त्यामध्ये आमचे दिव्यांगाचे जनसंपर्क कार्यालय काढण्यात आले. त्यामुळे दिग्रस तालुक्यातील सर्व दिव्यांग बांधव आणि भगिनी हे आपल्या दिव्यांगाच्या विविध समस्या सोडविण्याकरीता कार्यलय नसल्यामुळे ते ईकडे तिकडे भटकत आहे. त्यामुळे त्यांच्या समस्या सोडविल्या जात नाही. शासनाचा असा जि.आर आहे की, दिव्यांगाना २०० चौ फुट जागा उपलब्ध करुन देता येते.तरी दिव्यांग बांधव भगिनींचे समस्याचे निराकरण करण्याकरीता त्यांचे सोयी सुविधे करीता आपल्या पंचायत समितीच्या कार्यालया आवारात दिव्यांगाचे कार्यालया करीता जागा उपलब्ध करून देण्यात यावा अन्यथा आपल्या कार्यालयामध्ये एखादी रुम उपलब्ध करुन देण्यात मागणीला घेऊन आज अपंग जनता दल सामाजिक संघटनाचे यवतमाळ जिल्हाध्यक्ष दीपक जाधव यांच्या नेतृत्वामध्ये गटविकास अधिकारी यांना निवेदन सादर करून मागणी करण्यात आली आहे…


