गजानन डाबेराव तालुका प्रतिनिधी नांदुरा
नांदुरा : पंचायत राज समितीच्या शिफारशीप्रमाणे नांदुरा पंचायत समितीची सन २०२४-२५ वार्षिक आमसभा व सरपंच मेळावा रविवार दि.२३ मार्च रोजी स्थानिक श्री हरिभाऊजी पांडव मंगल कार्यालयात सकाळी११ वाजता मलकापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार चैनसूख संचेती यांचे अध्यक्षतेखाली संपन्न झाला.त्यावेळी मंचावर माजी बांधकाम सभापती बलदेवराव चोपडे, शिवाजीराव पाटील,शैलेश मिरगे,अनिल इंगळे, गजानन चरखे, सरपंच संघटनेचे ज्ञानेश्वर ढोले,गटविकास अधिकारी बी बी हिवाळे सहा. गटविकास अधिकारी चव्हाण, गट शिक्षणाधिकारी जितेंद्र प्रधान, तालुका कृषी अधिकारी निमकर्डे, पशुधन विकास अधिकारी राठोड, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. स्नेहा पाटील, सहा. गट विकास अधिकारी प्रशांत जामोदे,बांधकाम अभियंता सोळंके तसेच सर्व विभागाचे विभाग प्रमुख,अधिकारी, कर्मचारी,सर्व गावचे सरपंच, उपसरपंच, सद्या व समस्त नागरिक हजर होते. या सरपंच मेळावा व वार्षिक आमसभेची सुरुवात दीप प्रज्वलन करून करण्यात आली व सर्व विभाग प्रमुखांनी सन२०२४-२५ च्या कार्याचा आढावा सादर केला.त्यावेळी पाण्यासारख्या महत्वाच्या अशा जलजीवनची भिलवडी, खैरा, इसबपूर, खेर्डा, नारायणपूर, अवधा ई. गावाची कामे अपूर्ण असल्याची तक्रार त्या त्या गावच्या सरपंचानी केली. सोबतच इतरही वेगवेगळ्या विभागाबाबत अनेक नागरिकांनी तक्रारी केल्या त्यावेळी आ. संचेती यांनी त्या त्या विभागप्रमुखांना सर्व तक्रारीचे निवारण करण्याचे आदेश दिले.आपल्या अध्यक्षीय भाषणात आमदार संचेती यांनी आगामी काळात विकासकामावर सर्वांनी एकजुटीने व सर्वाना सोबत घेऊन प्रयत्न करण्याचे व त्यासाठी मी स्वतः प्रयत्नशील राहील असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.विज्ञान प्रदर्शनीत पोटळी येथील शाळेतील बालवैज्ञानिक विजया तडपते या विद्यार्थिनीने अपघात रक्षक चष्मा बनवून जिल्हास्तरावर आपले नाव उज्वल केल्याबद्दल कार्यक्रमाचे अध्यक्ष चैनसूख संचेती यांचे हस्ते सत्कार करण्यात आला.सोबतच पत्रकार,सरपंच, शिक्षक, शिक्षिका,खेळाडू व विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या कर्मचाऱ्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विजय सोनाग्रे सर यांनी केले. तर आभार प्रदर्शन कृषी विस्तार अधिकारी प्रशांत जामोदे यांनी केले.


