संतोष पोटपिल्लेवार
तालुका प्रतिनिधी, घाटंजी.
घाटंजी:- तालुक्यातील पी एम श्री जिल्हा परिषद शाळा किन्ही (की) पंचायत समिती घाटंजी येथे आरोग्य शिबीर घेण्यात आले प्राथमिक आरोग्य केंद्र रामपूर येथील आरोग्य पथक तसेच तालुक्यातील नामांकित विविध वैद्यकीय तज्ञांना आमंत्रित करण्यात आले. विद्यार्थ्यांचे आरोग्य सुदृढ राहावे या दृष्टीकोनातून आरोग्य विषयक समस्या ओळखून त्यांचे निराकरण करण्याकरिता सदर शिबिराचे आयोजन करण्यात आले .या शिबिराचे रीतसर उद्घाटन करण्यात आले कार्यक्रमाचे अध्यक्ष शाळा व्यवस्थापन समितीचे चे अध्यक्ष मारोती राठोड होते तर प्रमुख पाहुणे म्हणून बालरोग तज्ञ डॉ. सौ. प्रीती प्रफुल्ल सिडाम, दंतरोग तज्ञ डॉ.सौ.रुचिता कपिल चन्नावार, होमिओपॅथी तज्ञ कू.सोनाली बडोदेकर ,सौ अनुश्री भंडारवार,प्रा.आ. केंद्र रामपूर चे वैद्यकीय अधिकारी डॉ.संजय पुराम तसेच आरोग्य पथक होते.सायबर गुन्हे बाल लैंगिक अत्याचार सुरक्षा मार्गदर्शन करण्याकरिता विधितज्ञ अँड सौ रागिणी नेताजी राऊत यांची देखील प्रमुख उपस्थिती होती. त्यांनी पोक्सो कायदा
लैंगिक अत्याचार व घ्यावयाची खबरदारी यावर मार्गदर्शन केले. डॉ प्रिती सिडाम यांनी विद्यार्थ्यांना आरोग्य विषयक योग्य सवयी बद्दल मार्गदर्शन केले. डॉ.रुचिता चन्नावार यांचे दंत विषयक काळजी कशी घ्यावी जंक फूड खाल्ल्यानं होणारे दुष्परिणाम याबद्दल चे मार्गदर्शन लाभले. डॉ सोनाली बडोदेकर यांनी पूरक आणि पोषक आहार कोणता आणि आहार कसा असावा याबद्दल मुलांना माहिती दिली. कुष्ठरोग संदर्भात डॉ सजय पुराम यांनी माहिती दिली.
शाळेतील सर्व विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करुन औषधी वितरण करण्यात आले.एकंदरीत शाळेचे बाह्यांग कार्यक्रमाचे आयोजन या विषयी मान्यवरांनी शाळेचे कौतुक केले.कार्यक्रमाला शाळा व्यवस्थापन समिती चे सर्व सदस्य ,मुख्याध्यापक राम भंडारवार सर्व शिक्षक वृंद व विद्यार्थी हजर होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इमडे सर तर आभार प्रदर्शन इंगळे सर यांनी केले.


