सिध्दार्थ कांबळे
ग्रामीण प्रतिनिधी बिलोली
नांदेड : जिल्ह्यातील बिलोली तालुक्यातील कुंडलवाडी शहरापासून अंतरावर असलेल्या मौजे हुनगुंदा येथील रहिवासी असलेल्या अल्पवयीन मुलीस फूस लावून पळून नेऊन तिला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यासोबत शारीरिक संबंध ठेवल्याप्रकरणी कुंडलवाडी पोलीस ठाण्यामध्ये पोक्सो व ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे .
याबाबत सविस्तर माहिती असे की,पोलीस स्टेशन कुंडलवाडी गुन्हा रजि. नंबर ४९/२०२५ कलम १३७(२) भारतीय न्याय संहीता अन्वये दाखल गुन्हयामध्ये कलम ३(१)(डब्ल्यु),३(२)(५) (अ) अनु. जाती व जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा व सहकलम ६४,३ (५) भारतीय न्याय संहीता व कलम ४,६,८,१२ लैंगिक गुन्हयापासुन मुलांचे संरक्षण कायदा (पोक्सो) कायदा अन्वये कलम वाढ करुन आरोपीतांना अटक केले बाबत. दिनांक १४/०३/२०२५ रोजी फिर्यादी महीला नामे शेषाबाई भ्र.गंगाराम सोनकांबळे वय ६० वर्ष रा.हुनगुंदा ता.बिलोली यांनी पो.स्टे कुंडलवाडी येथे हजर येवुन तिची अल्पवयीन नात ही पुणे येथे जातो असे म्हणुन तिच्या राहत्या गावातुन तिच्या लहान भावासोबत कुंडलवाडी येथे आली. व तिच्या भावाची नजर चुकवुन निघुन कोठेतरी गेली.कोणीतरी अज्ञात इसमाने तिच्या अज्ञानपणाचा फायदा घेवुन अज्ञात कारणासाठी फुस लावुन पळवुन नेले अशा आशयाची तक्रार प्राप्त झाल्यावरुन पोलीस स्टेशनला गुन्हा रजि. नंबर ४९/२०२५ कलम १३७ (२) भारतीय न्याय संहीता अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. नमुद गुन्हयाचा तपास कुंडलवाडी पोलीस स्टेशन करीत आहेत. नमुद गुन्हयातील अल्पवयीन मुलगी ही दिनांक १९/०३/२०२५ रोजी पोलीस स्टेशन कुंडलवाडी येथे आली. त्यानंतर गुन्हयातील फिर्यादी महिलेने नमुद अल्पवयीन मुलीस विचारणा केली. अल्पवयीन मुलीने सदर फिर्यादी महीलेस सांगीतलेल्या हकीकतीप्रमाणे फिर्यादी महीलेने दिनांक २०/३/२०२५ रोजी पुरवणी जबाब नोंदविला की,तिच्या अल्पवयीन मुलगी ही बौध्द (अनुसूचित जाती) समाजाची आहे हे माहीत असतांना देखील आमच्या गावातील व गल्लीतील मुलगा समीर उस्मान शेख याने अल्पवयीन मुलीसोबत लग्न करतो असे आमिष दाखवुन तिस फुस लावुन कुंडलवाडी येथुन मेडचल (तेलंगणा राज्य) येथे घेवुन गेला. मेडचल गावातील लॉजवर तसेच तेथील भाडयाने केलेल्या रुममध्ये आपण नवरा बायकोसारखे राहुयात आपण लवकरच लग्न करु असे म्हणुन तिच्यासोबत दिनांक ०५/०३/२०२५ ते दिनांक १८/०३/२०२५ पावेतो शारीरीक संबंध केले असल्याचे सांगीतले तसेच समीर शेख यास पळून जाण्याकरीता गावातील सुर्यकांत शंकरराव धर्मापुरे याने मदत केली असल्याबाबत पुरवणी जबाब दिल्याने नमुद गुन्हयामध्ये कलम ३(१) (डब्ल्यु), ३ (२) (५) (अ) अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा व सहकलम ६४,३ (५) भारतीय न्याय संहीता व कलम ४,६,८,१२ लैंगिक गुन्हयापासुन मुलांचे संरक्षण कायदा (पोक्सो) कायदा अन्वये कलम वाढ करण्यात आली असुन नमुद गुन्हयाचा तपास श्री.संकेत गोसावी उपविभागीय पोलीस अधिकारी,उपविभाग, देगलुर चार्ज धर्माबाद हे करीत आहेत. नमुद गुन्हयामध्ये गुन्हयातील आरोपी नामे १) समीर उस्मान शेख वय २४ वर्ष व्यवसाय शेती रा. हुनगुंदा ता.बिलोली आरोपी २) सुर्यकांत शंकरराव धर्मापुरे वय २१ वर्ष व्यवसाय शेती रा. हुनगुंदा ता. बिलोली यास सदर गुन्हयाच्या अनुषंगाने आज दिनांक २१/०३/२०२५ रोजी अटक करण्यात आल्याची माहिती कुंडलवाडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर शिंदे यांनी दैनिक अधिकारनामा प्रतिनिधींशी बोलताना सांगितले आहे.


