भगवान कांबळे जिल्हा प्रतिनिधी नांदेड
नांदेड – पैनगंगा नदीच्या दोन्ही बाजूंनी सहस्त्रकुंड ते वर्धा नदी पर्यंत आंदजे लांबी २९१ कि.मी. लांबीची पुररेषा निश्चित करण्याचे सर्वेक्षणाचे काम यवतमाळ जिल्हा आपत्ती व्यवस्थापन शाखेतर्फे निम्न पैनगंगा प्रकल्पाकडे देण्यात आले.असले तरी अतिवृष्टी झाली की पुर परिस्थिती निर्माण होते आणि त्या अनुषंगाने पुररेषा निश्चित करण्याचे काम जिल्हाधिकारी कार्यालय यवतमाळ यांचे आपत्ती व्यवस्थापन शाखेतर्फे शाखा अंतर्गत करण्यात येत आहे असे पत्र जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड यांना कार्यकारी अभियंता निम्मन पैनगंगा प्रकल्प यवतमाळ यांनी यांचे मार्फत कळविले आहे की पैनगंगा नदीच्या पुररेषा निश्चित करण्याचे काम सुरू झाले आहे पैनगंगा नदीला पूर आल्यानंतर धोक्याची पातळी ओलांडली की नागरिकांना स्थलांतरित करण्यासाठी पुररेषा निश्चित केल्या की नागरिकांना स्थलांतरित करण्यासाठी संबंधित विभागाला उपाययोजना करणे सोपे जाईल. परंतु ही उपाययोजना निम्न पैनगंगा प्रकल्पाला च का देण्यात आली मग ही उपाययोजना राज्य भर राबवायला पाहिजे मग या उपाययोजना राज्य भर राबवण्याचा जी आर आहे का असा प्रश्न धरण विरोधी संघर्ष समिती मार्फत बाबु फारुकी यांनी प्रश्न उपस्थित केला तसेच किनवट, माहुर तालुक्यातील पेसा अंतर्गत ग्रामपंचायत आहेत यांच्या ग्रामसभा घेऊन संबंधित विभागाने त्या गावच्या पेसा ग्रामपंचायतीची प्रवानगी न घेता शेतकऱ्यांच्या जमिनी मोजन्याचा निम्मन पैनगंगा प्रकल्प कार्यालयाने प्रयत्न केला आहे. त्या अनुषंगाने धरण विरोधी संघर्ष समितीने लोकशाही मार्गाने मोजनीचे काम बंद केले.आणि आता पण लोकशाही मार्गाने पेसा ग्रामपंचायतीचा ठराव घेतल्या शिवाय सर्वेक्षण करुदीले जाणार नाही. निम्न पैनगंगा प्रकल्पाच्या अधिकारी यांनाच पुररेषा निश्चित सर्वेक्षण करण्याचे काम देणे संशयास्पद असल्याचे धरण विरोधी संघर्ष समितीने समन्वय बैठकीत आपले म्हणणे सादर करत असताना बैठकच आटोपली कोणताही ठोस निर्णय न घेता बैठक आटोपली बैकीला उपस्थित साह्यक जिल्हाधिकारी मेघना कावली किनवट, तहसीलदार साहेब,किशोर यादव,तहसील कार्यालय माहुर, घाटंजी चे उपविभागीय अधिकारी व्ही.जी. बोरकर, सा.पो.नि. श्री शिवप्रकाश मुळे साहेब ठाणेदार माहुर व धरण विरोधी संघर्ष समितीचे पदाधिकारी प्रल्हाद गावंडे, मुबारक तवर,बाबु फारुकी,काॅ. शंकर सिडाम,अॅड पंजाबराव गावंडे, बंडु नाईक, उपस्थित होते. तसेच तहसीलदार साहेब यांच्या दालनात धरण विरोधी संघर्ष समिती आपले मत नोंदवत असतांना बुडीत क्षेत्रातील काही दोन चार गावातील विकासकामे बंद केले असल्याचे मा. साह्यक जिल्हाधिकारी किनवट यांच्या निर्देशानास आणुन दिले असल्याचे धरण विरोधी संघर्ष समितीचे प्रसिद्धी प्रमुख श्री मुबारक तवर यांनी सांगितले आहे.


