मारोती बारसागडे
जिल्हा प्रतिनिधी गडचिरोली
गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यातील प्रसिद्ध मार्कंडा यात्रेत लुबि कंपनीचे अधिकृत विक्री निर्मल अग्रो मशीनरी यांनी उत्साहात सहभाग नोंदवला. यात्रेतील विविध धार्मिक सांस्कृतिक आणि सामाजिक कार्यात सक्रिय सहभाग घेतला.
लुबि कंपनीचे अधिकृत विक्रीते निर्मल अग्रो मशीनरी यांनी यात्रेदरम्यान प्रदर्शनी पानी अडवा आणि पाणी जीरवा जनजागृती या उपक्रमांना भाविकांचा आणि स्थानिक नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.यावेळी लुबि कंपनी चे मैनेजर श्री आकाश गदिलवार म्हणाले, मार्कंडा यात्रा ही केवळ धार्मिक उत्सव नसून, ती सामाजिक आणि सांस्कृतिक एकतेचे प्रतीक आहे. या यात्रेत सहभागी होऊन आम्हाला गडचिरोलीतील लोकांच्या संस्कृतीचा आणि परंपरेचा अनुभव घेता आला. यात्रेतील भाविकांचा उत्साह आणि श्रद्धा पाहून आम्ही भारावून गेलो आहोत.
लुबि कंपनीचे अधिकृत विक्री निर्मल अग्रो मशीनरी ते यांनी यात्रेतील यशस्वी सहभागाबद्दल सर्व भाविकांचे, प्रशासनाचे आणि स्थानिक नागरिकांचे आभार मानले.











