सुरेश नारायणे तालुका प्रतिनिधी, नांदगाव
नांदगाव:नांदगाव तालुक्यातील बोलठाण येथे महाशिवरात्रीच्या निमित्ताने दोन दिवस विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई करून मंदिराचा गाभारा सुगंधी फुलांनी सजविला होता. या कार्यक्रमाची सुरुवात दिनांक 24 फेब्रुवारी 2025 रोजी सायंकाळी पाच वाजेपासून सामुदायिक हरिपाठ होऊन रात्री साडेआठ वाजता युवा कीर्तनकार ह.भ.प. ज्ञानेश्वर भवर महाराज यांचे कीर्तन झाले. बुधवारी महाशिवरात्रीच्या पूर्व काळापासून पहाटेपासूनच भाविकांनी जलभिषेक करण्यासाठी गर्दी केली होती.सकाळी ठीक सात वाजता श्री शिवमहिन्म स्तोत्राचे पठण माजी प्राचार्य रमेश बोबडे व सहकार यांच्या वाणीतून झाले. त्यानंतर दहा वाजता प्रजापती ब्रह्मकुमारी विद्यालयाच्या केंद्र संचालिका कमल दिदी यांचा शिवमहिमा या विषयावर व्याख्यानाचा कार्यक्रम झाला. दुपारी बारा वाजता देवाची अभिषेक व सुंदर पूजा करून चार वाजता ब्रास बँड वाद्यात शंकर-पार्वतीच्या जीव देखाव्यासह भव्य अशी वरात काढण्यात आली. यामध्ये मोठ्या संख्येने ग्रामस्थ सहभागी झाले होते. मिरवणुकी सांगता महाआरती व शाबुदाणा खिचडीचा प्रसाद वाटप करण्यात आला. रात्री आठ वाजता भागवताचार्य ह.भ.प. पंढरीनाथ महाराज पगार यांचे शिव भोळा चक्रवर्ती या अभंगातून भगवान शिव कीर्तनातून शंकराच्या स्वभावाची ओळख उपस्थित त्यांना करून दिली. तसेच शिवभक्तीचे महत्त्व पटवून दिले. या कार्यक्रमातील सर्व धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन पूर्णारती दत्त भजन मंडळाने ग्रामस्थांच्या सहकार्याने केले होते. सर्व कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी माजी शिक्षक रमेश बोबडे, शिक्षक विजयकुमार शेलार, संतोष बोरसे, नितीन कायस्थ, किरण सूर्यवंशी, निलेश शितोळे, भगवानराव जाधव, सचिन बारवकर, दिलीप जाधव, अनिल बाविस्कर, संकेत वाघ, तन्मय जोशी यांनी विशेष परिश्रम घेतले.











