दिपक केसराळीकर
तालुका प्रतिनिधी बिलोली
बिलोली नगर परिषदेत मोठया प्रमाणात अनागोंदी कारभार चालत असून अनेक भ्रष्टाचार व कर्मचाऱ्यांचे गैरव्यवहार लेखा परीक्षण अहवालात आढळून आला असून क दर्जाची नगर परिषद असलेल्या बिलोली नगर परिषदेची 42 च्या वर बँक खाती आहेत. यातील अनेक खाते मृत झालेली आहेत.बिलोली नगर परिषदेत मोठा अनागोंदी कारभार चालत असून गेल्या अनेक वर्षांपासून नगर पालिकेत भ्रष्टाचार व गैरव्यवहार झाला असून विशेष म्हणजे आतापर्यंत दहा ते पंधरा मुख्याधिकाऱ्यांनी या नगर परिषदेत आपले कर्तव्य बजावले आहे. त्यांना हि गंभीर बाब कशी निर्दशास आली नाही…? असा सवाल बिलोली शहरातील माहिती अधिकार तसेच सामाजिक कार्यकर्ते आणि सुप्रीम ह्यूमन राइट्स इंडिया चे राष्ट्रीय संघटक लक्ष्मीकांत कलमुर्गे तसेच बिलोली शहर वासियांच्या वतीने करण्यात येत आहे.महाराष्ट्र नगर परिषद, नगरपंचायती व औद्यौगिक नगरी अधिनियम 1965 मधील कलम 99 (1) अन्वये नगर परिषदेचा निधी स्टेट बँक ऑफ इंडिया, महाराष्ट्र ग्रामीण बँक, अक्सीस बँक, नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बैंक किंवा शासकीय कोषागाराचे काम ज्या बँकेकडे सोपवले आहे, अशा बँकेत किंवा इतर कोणत्याही अनुसूचित बैंकेत ठेवला जाईल, असे निर्देश आहेत. त्यानुषंगाने नगर परिषद बिलोलीचे विविध अनुसूचित बँकेत एकूण 42 च्या वर बैंक खाती आहेत. सदर बँक खाती तपासली असता एकाच योजनेची दोन-दोन बँक खाती आहेत. तसेच बऱ्याच बँक खात्यावर सतत व्यवहार झालेले दिसून आले नाहीत. ती खाती मृत झालेली आहेत. बिलोली नगर परिषदेच्या लेखा परीक्षण अहवालात म्हटले आहे की
नगर परिषदेने अशी मृत बँक खाती बंद करून अनावशक खात्यांची संख्या कमी करावी. जेणेकरून नगर परिषदेला आपले कामकाज व्यवस्थित रित्या पार पाडता येईल. परंतु या नगर परिषदेत मुख्याधिकारी काम करायला उदासीन दिसून येत आहेत. मुख्याधिकारी कायमस्वरूपी नसल्यामुळे व वारंवार मुख्यधिकारी बदलल्यामुळे कार्यालयीन कर्मचाऱ्यावर कुणाचाही वचक राहिला नाही. नगर परिषद कार्यालयातील अनागोंदी कारभारामुळे अनेक गैरव्यवहार झाल्याचे लेखा परीक्षण अहवालात दिसून येत आहे. झालेल्या गैरव्यवहाराची चौकशी जिल्हाधिकाऱ्यांनी करावी अशी मागणी शहरातील नागरिकांतून होत आहे.


