भगवान कांबळे
जिल्हा प्रतिनिधी नांदेड
माहूर – पवित्र रमजान महिना सुरू होत असून पवित्र रमजान महिन्याच्या अनुषंगाने उर्स महोत्सवात येणाऱ्या सर्व नागरिकांनी शांतता व सकार्याची भुमिका ठेवावी पोलीस प्रशासनाबरोबर आपली सुध्दा जबाबदारी आहे कायदा व सुव्यवस्था राखण्याची त्यामुळे सर्वांनी बंधुत्वानी उर्स महोत्सवाचा आनंद घ्यावा असे सुतोवाच मा.साह्यक पोलीस निरीक्षक शिवप्रकाश मुळे साहेब ठाणेदार पोलीस स्टेशन माहुर यांनी केले. येणाऱ्या ५ मार्च रोजी सोनापीर बाबा दर्गा उर्स महोत्सवाला सुरुवात होत असून दिनांक १० मार्च पर्यंत उर्स महोत्सव चालू राहील यावर्षी उर्स कालावधीत पवित्र रमजान महिना येत असल्याने कव्वाली चा कार्यक्रम होणार नसुन ईतर सर्व मनोरंजनात्मक राहणार असल्याचे बाबर अहेमद फकीर मोहंम्मद (मुजावर/पुजारी)सोनापीर बाबा दर्गा माहुर यांनी सांगितले आहे. तसेच आयोजित बैठकीला उपस्थित झाल्या संबंधित सर्वांचे आभार मानले.मा. तहसीलदार साहेब यांनी सर्व विभागांना आप आपल्या विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या व्यवस्था संबधी आढावा घेतला असून महावितरण विभागाकडून विद्युत पुरवठा सुरळीत व नियमित असावा तसेच पाण्याची सुविधा नगरपंचायत यांच्या कडे असुन सन्माननीय मुख्याधिकारी समवेत माहुर नगरीचे नगराध्यक्ष फीरोज दोसानी यांनी नगरपंचायत मार्फत पुरविण्यात येणाऱ्या सोयीसुविधा देण्याचे आश्वासन दिले आहे.तसेच माहुर बसस्थानक आगारातर्फे बस वाढविण्यासंबधी सूचविले असता माहुर बसस्थानक आगाराला वेळापत्रकानुसार एवढेच एसटी बस उपलब्ध असुन जादा गाडी सोडण्या करीता एसटी बस नाही.असे असले तरी यवतमाळ माहुर बसच्या फेरीत वाढ करु असे आश्वासन दिले आहे.उपस्थीत सर्व विभाग अधिकारी व कर्मचारी आणि पत्रकार बांधव यांच्या उपस्थितीत मा.किशोर यादव तहसीलदार साहेब तहसील कार्यालय माहुर यांनी बैठकीची सागंता केली.


