संतोष पोटपिल्लेवार तालुका प्रतिनिधी, घाटंजी
घाटंजी:- तालुक्यातील सर्व तिरळे कुणबी समाजाच्या वतीने आयोजित सुपुनाथ मंगलम् मुर्ली घाटंजी येथे पार पडला परिचय मेळाव्याच्या सुरुवातीला दोन चिमकल्या मुली महेक नेताजी राऊत आणी स्वरा बापू ईगोले यांनी स्वागताच्या गीताने सुरुवात केली समाजातील गुणवंताचा गुण गौरव विनोद ठाकरे, सागर महल्ले, तुषार मानकर, यांचा कुनबित्वाचा गुणगौरव दादाजी उगले व भास्कर मोघे यांच्या हस्ते पार पडला तिरळे कुणबी समाजातील जेष्ठ मंडळी सतीश भोयर सुरेश, पाटील राऊत, गौत्तम चौधरी, जयवंत निवल, दादाजी उगल, सुरेश डहाके, उमाकांत ठाकरे, भास्कर मोघे यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. परिचय मेळाव्याला शंभरच्या वर उपवर उपवधू यांनी आपला परिचय दिला.सम्पूर्ण यवतमाळ व लागतच्या जिल्यातील तिरळे कुणबी समाज परिचयाच्या माध्यमातून एक वटला होता या कार्क्रमाची सुरुवात सूत्रसंचालन अनिल उर्फ बालू डहाके यांनी केले प्रास्तविक शैलेश इंगोले यांनी केले तर मनोज गवळी यांनी पुढील कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले उपवर उपवधू परिचयाचे सूत्रसंचालन प्रशांत उगले व स्नेहल संतोष चौधरी यांनी केले तर आयोजन समितीचे स्वागत विजय पाटील राऊत, यांनी केले तर तिरळे कुणबी समाज आयोजन समितीच्या वतीने एकता पत्रकार संघाचे अध्यक्ष तथा दै.देशोन्नतीचे तालुका प्रतिनिधी कैलास कोरवते, सचिव तथा दै.दिव्य मराठीचे तालुका प्रतिनिधी संतोष अक्कलवार,दै.पुण्यनगरीचे अनंत भाऊ नखाते,सुपर भारत चे दिनेश गाऊत्रे, विलास महल्ले पत्रकार बांधव यांचा सत्कार करण्यात आला व सर्व कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन पत्रकार अरविंद मामा चौधरी यांनी केले व सुंदर रांगोळी प्रदर्शन कु अक्षरा उगले व ईशानी मारोत्तकार यांनी केले या कार्यक्रमास सल्लागार समिती व आयोजन समिती शैलेश इंगोले, चंद्रशेखर ठाकरे, प्रशांत उगले, विद्याधर राऊत, भास्कर मोघे, अरविंद चौधरी, मनोज गवळी, गिरीष बोरकर, अनिल डहाके, अनिल गावंडे, स्वप्नील भोंग, रवी ठाकरे, अमीत महल्ले, पत्रकार नंदकिशोर डभारे, विशाल भुरे, पंकज ठाकरे, प्रशांत चौधरी, राहुल पाटील, संतोष गावंडे, मनोज ढगले, यांच्या सह घाटंजी तालुका तिरळे कुणबी समाज बांधव यांनी सहकार्य केले.

