शेख शेमशुध्दीन
तालुका प्रतिनिधी मुदखेड
मुदखेड – मुदखेड शहरातील मुख्य बाजारपेठेतील बेकरी स्वीट मार्ट ला शॉर्टसर्किटने लागलेल्या आगेत दुकान जळून खाक झाले असून यामध्ये आठ लाखांचे नुकसान झाले आहे. आग विझवण्यासाठी युवकांनी धाव घेतल्याने इतर दुकानांचे नुकसान टळले असून युवकांच्या धाडसाचे कौतुक केले जात आहे
शहरातील सुभाष गंज या ठिकाणी राज पुरोहित बिकानेर आहे या बेकरी स्वीट मार्ट दुकानास.ता. 4. (मंगळवारी)रात्री उशिरा शॉर्टसर्किटने आग लागण्याची घटना घडली आहे या आगीत दुकानातील (स्वीटमार्ट) बेकरीचा माल व इतर साहित्य जळून खाक झाले आहे आगीच्या घटनेची माहिती मिळताच युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष मुजीब पठाण म. फेरोज. आसिफ पठाण. म. आखिब शेख मोईन बीट जमादार बलवीर सिंग ठाकूर नगरपालिका कर्मचारी रमेश हातागळे लक्ष्मण भांगे. यांनी घटनास्थळी धाव घेतली आग विझवण्यासाठी युवकांनी शर्थीचे प्रयत्न केले मुजीब पठाण यांनी अग्निशमन दलाशी संपर्क करून पाचारण केले..
मुख्य बाजारपेठेतील आगीने उग्र स्वरूप धारण करण्याचे अगोदर वीज मंडळाचे विद्युत पुरवठा त्वरित खंडित करण्यात आला यामुळे आजूबाजूच्या दुकानास आगीपासून रोखण्यास यश आले आहे युवकांच्या या धाडसी प्रयत्नामुळे होणारे नुकसान टळले आहे बाजारपेठेतील सर्व व्यापाऱ्यांनी युवकांचे कौतुक केले आहे.

