राजु वि बडेरे
ग्रामीण प्रतिनिधी जळगाव (जामोद)
जळगाव जामोद:- जिल्ह्यात होत असलेल्या जबरी चोऱ्यांच्या घटनांच्या उकल करण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेने केलेल्या कारवाईत लाखोंच्या मुद्देमाला सह जळगाव येथील आरोपीस अटक करण्यात आली आहे.पोलीस स्टेशन जळगाव जामोद हद्दीमध्ये दि.८/१२/२०२४ रोजी साडेअकरा वाजेच्या सुमारास शेतात जात असताना अनोळखी आरोपीने रस्ता अडवून मारहाण करून शालु धम्मपाल दामोदर राहणार खेर्डा खुर्द यांच्या गळ्यातील ३ ग्रॅम सोन्याचे मनी असलेली पोत किंमत १८ हजार रुपये व मोबाईल एक हजार रुपये किमतीचा घेऊन पळून गेला होता. यामध्ये पोलीस स्टेशनला अज्ञात आरोपी विरोधात अप.नं ७०२/२०२४ कलम ३०९(६),११५(२) भारतीय न्यायसंहितेप्रमाणे गुन्हा दाखल झाला होता. जिल्ह्यात होत असलेल्या जबरी चोरीच्या घटनांची गंभीर दाखल घेऊन जिल्हा पोलीस अधीक्षक विश्व पानसरे,अप्पर पोलीस अधीक्षक अशोक थोरात, बीबी महामुनी यांनी चोरीच्या गुंडांचा सखोल तपास करणे व गुन्ह्यांची उकल करून आरोपीचा शोध घेऊन मुद्देमाल हस्तगत करणे बाबत स्थानिक गुन्हे शाखा बुलढाणा यांना आदेशित केले होते. त्यानुसार पोलीस निरीक्षक अशोक लांडे यांनी स्वतंत्र पथक तयार करून जबरी चोरीच्या गुन्ह्याचा तपास करून उकल तसेच आरोपीचा शोध आणि गेलेला मुद्देमाल हस्तगत करणे बाबत पथकास सूचना केल्या होत्या. चोरीच्या गुन्ह्यांचा स्थानिक गुन्हे शाखेने तपास करून गुन्ह्यांमध्ये आरोपीस व त्याच्या ताब्यातील मुद्देमाल हस्तगत स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव काजी मझहरोद्दिन झुबेरोद्दिन वय ३६ वर्ष राहणार राणी पार्क जळगाव जामोद येथील असून याच्या ताब्यातून सोन्याचे मनी वजन ६.९६० ग्रॅम किंमत ४२०००/-एक मोटर सायकल किंमत ६००००/-दोन मोबाईल किंमत ११०००/-असा एकूण १ लाख १३ हजार रुपयांचा मुद्देमाल स्थानिक गुन्हे शाखेने जप्त केला आहे. चौकशी दरम्यान आरोपीने सोनाळा येथील एका जबरी चोरीच्या गुन्ह्याची कबुली दिली आहे. गुन्ह्याचा पुढील तपास जळगाव जामोद पोलीस करीत आहेत. सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक बुलढाणा विश्व पानसरे, अप्पर पोलीस अधीक्षक अशोक थोरात, अप्पर पोलीस अधीक्षक बुलढाणा बी बी महामुनी यांच्या आदेशाने व मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अशोक लांडे प्रभारी अधिकारी स्थानिक गुन्हे शाखा यांच्या नेतृत्वात सहाय्यक पोलीस निरीक्षक रुपेश शक्करंगे, पोलीस हेड कॉन्स्टेबल दीपक लेकुरवाळे, गणेश पाटील, चांद शेख, पोलीस कॉन्स्टेबल गोपाळ तारुळकर, चालक पोलीस कॉन्स्टेबल पुंड यासह स्थानिक गुन्हे शाखा बुलढाणा व पोलीस हेडकॉन्स्टेबल राजू आडवे, पोलीस कॉस्ट ऋषिकेश खंडेराव तांत्रिक विश्लेषण विभाग बुलढाणा यांनी केली आहे.

