रवि राठोड
ग्रामीण प्रतिनिधी वाकान
महागांव ः तालुक्यातील मौजा तिवरंग ग्रामपंचायतीची यवतमाळ जिल्ह्यातुन पोकरा या योजनेसाठी नुकतीच निवड झाली आहे नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्याला सुरूवात झाली असून यामध्ये महागांव तालुक्यातील तिवरंग ग्रामपंचायतीची पोकरा योजनेसाठी निवड झाली असून पोकरा योजना म्हणजेच नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प हि योजना गावस्तरावर विकास कार्यासाठी राबविण्यात येते या योजनेच्या माध्यमातून गावातील विकास आराखडे तयार केले जातात या आराखड्यात नैसर्गिक साधनांचा योग्य वापर करून बाजारपेठेतील सुधारीत प्रवेश यांचा समावेश असतो या योजनेच्या माध्यमातून गावातील शेतकरी बांधवांना तुषार संच, इलेक्ट्रीक मोटार,टिबंक सिंचन, स्प्रिंकलर, ट्रॅक्टर इत्यादी शेती उपयोगी यंत्र व साहित्य दिले जातात पोकरा योजने अंतर्गत सर्वसामान्य प्रकल्पात ५०% टक्के अनुदान दिले जाते पोकरा योजने अंतर्गत येणाऱ्या सर्व लाभार्थ्यांना उचीतच लाभा पर्यंत पोहोचविण्याचा व त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी तिवरंग येथील कर्तव्यदक्ष सरपंचा सौ.जयश्री सुनिल राठोड हे कटिबद्ध राहणार असल्याचे त्यांनी सरपंच प्रशिक्षण कार्यक्रमात म्हटले व तसेच गावचा विकास हाच फक्त माझा ध्यास असे प्रतिपादन तिवरंग येथील विकासाभिमुख सरपंच यांनी प्रशिक्षण कार्यक्रमाच्या मंचावर सांगितले

