संतोष पोटपिल्लेवार
तालुका प्रतिनिधी, घाटंजी
घाटंजी:- आबासाहेब देशमुख आश्रम शाळा जरूर तालुका घाटंजी या शाळेतील पदवीधर प्राथमिक शिक्षक गुणवंत मासुलकर हे नियत वयोमानानुसार दिनांक ३१ जानेवारी २०२५ रोजी सेवानिवृत्त झाले आहेत. सन १९९५ ला ते सेवेत रुजू झाले तीस वर्षाच्या सेवेनंतर त्यांचा सेवापूर्ती सत्कार सोहळा आश्रम शाळा जरूर येते आयोजित करण्यात आला होता सेवापूर्ती सोहळ्याचे अध्यक्ष शाळेचे मुख्याध्यापक आर. टी. टेकाम सर विशेष अतिथी आबासाहेब देशमुख आश्रम शाळा पहापळ चे मुख्याध्यापक शाळा समिती प्रमुख सुनील ठाकरे सर, उद्घाटक म्हणून प्राथमिक आरोग्य केंद्र शिवनी चे डॉ. संजय वाघ, प्रमुख उपस्थिती केंद्रप्रमुख गजानन मुळे, मुख्याध्यापक एस. एस किनकर सर, प्राथमिक शिक्षक विद्याधर राऊत, माध्यमिक शिक्षक सतीश पाटीले, प्रदीप ताकसांडे, विनोद भोयर, नीता पाटील, प्राथमिक शिक्षक दादाराव बोर्डे, लता देवरे, वस्तीगृह अधीक्षक पद्माकर इंगोले, स्त्री अधिक्षिका इंदिरा मासराम शिक्षक शिक्षकेतर व वसतिगृह कर्मचारी उपस्थित होते.

