संतोष पोटपिल्लेवार
तालुका प्रतिनिधी, घाटंजी
घाटंजी:-आबासाहेब देशमुख पारवेकर आश्रम शाळा जरूर येथे वार्षिक स्नेहसंमेलन विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव मिळावा याकरिता विविध स्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन दि. २९ जानेवारी ते ३१ जानेवारी २०२५ या कालावधीत करण्यात आले होते. तसेच २६ जानेवारी २०२५ प्रजासत्ताक दिनी सामान्य ज्ञान स्पर्धा परीक्षा विविध संदर्भीय विषयाने घेण्यात येते. या वर्षाचे निमित्त स्वर्गीय राजश्री पार्वतीबाई देशमुख पारवेकर यांच्या स्मृतिप्रितियार्थ ही परीक्षा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धा परीक्षेमध्ये प्राविण्य मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना पारितोषिक वितरण प्रसंगी प्रमाणपत्र, सन्मानचिन्ह, रोख रक्कम सामान्य ज्ञान पुस्तिका देऊन गौरविण्यात आले. आश्रम शाळेतील आदिवासी विद्यार्थ्यांच्या इतर कलागुनासह शारीरिक ,
मानसिक विकासासोबत बौद्धिक विकास व्हावा या एकमेव हेतूने प्रतिवर्षी विद्यार्थ्यांचा वाढता प्रतिसाद पाहता शाळेतील प्राथमिक शिक्षक विद्याधर राऊत यांच्या संकल्पनेतून सामान्य ज्ञान स्पर्धा परीक्षा हा उपक्रम राबविण्यात येत आहे.या स्नेह संमेलन समारोपीय बक्षिस वितरण समारंभाचे उद्घाटन प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉक्टर संजय वाघ यांच्या हस्ते पार पडले.तर विशेष अतिथी म्हणून आबासाहेब देशमुख पारवेकर आश्रम शाळा पहापळ येथील मुख्याध्यापक तथा शाळा निरीक्षण समिती प्रमुख सुनील ठाकरे सर यांनी सामान्य ज्ञान स्पर्धा परीक्षा हा उपक्रम पारवा शिक्षण संस्था पारवा अंतर्गत शाळेत राबविला जातो ही विद्यार्थ्यांसाठी एक चांगली संधी आहे. कार्यक्रमाचे अध्यक्ष माध्यमिक मुख्याध्यापक आर. टी. टेकाम सर यांनी आदिवासी आश्रम शाळेच्या विद्यार्थ्यांना भविष्यात या परीक्षेचा फार मोठा फायदा होईल असे सांगितले. प्राथमिक मुख्याध्यापक एस. एस. किनकर यांनी प्रास्ताविकातून सामान्यज्ञान स्पर्धा परीक्षेतून उद्याच्यासाठी विद्यार्थ्यांची चांगली तयारी होते असे सांगितले. प्रमुख पाहुणे शिवनी केंद्राचे केंद्रप्रमुख गजानन मुळे यांनी हा उपक्रम विद्यार्थ्यांसाठी अतिशय उपयुक्त आहे तो सार्वत्रिक राबवावा असे म्हटले.यावेळी सांस्कृतिक कार्यक्रमाचे परीक्षण माध्यमिक शिक्षक एस.डी. वातीले व डी.जी. बोर्डे यांनी केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राथमिक शिक्षक विद्याधर राऊत सर यांनी केले तर उपस्थित त्यांचे आभार माध्यमिक शिक्षक व्ही. एस. भोयर यांनी मानले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी पदवीधर प्राथमिक शिक्षक जी. के. मासुलकर, पी आर ताकसांडे सर, कु. एन. आय. पाटील कु. लता देवळे वस्तीगृह अधीक्षक पी.एम. इंगोले, स्त्री अधिक्षिका कु. आय. एम.मसराम व सर्व शिक्षकेतर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.

