बीट जमादार यांची कार्यवाही संशयास्पद
अनिस सुरैय्या
तालुका प्रतिनिधि महागांव
महागांव: महागांव शहरातील मुख्य बाजारपेठ असलेले आठवडी बाजार येथे शुक्रवारला साप्ताहिक बाजार भरतो व या बाजारात महागांव शहरासह ग्रामीण भागातील नागरिक येथे भाजी पाले तसेच ईतर जीवनावश्यक वस्तु खरेदी करीता नागरिक बाजारात येतात.परंतु मागील काही महिन्यांन पासुन महागांव आठवडी बाजारातुन मोबाइल चोरींच्या प्रकरणात वाढ झाली आहे.तसेच मोबाइल चोरी केल्यानंतर हे अज्ञात चोर मोबाइल हॅक करुन युपीआय द्वारे पैसे काढुन नागरीकांना लुटत आहेत.परंतु ज्यांचा मोबाइल चोरला गेला त्यांची मोबाइल चोरी झाल्याची तकरार न घेता मोबाइल गहाळ झाल्याची तकरार दाखल केली जात आहे.याच मोबाइल गहाळ झाल्याची तकरार दाखल केल्यामुळे याचा फायदा चोरांना होत आहे.त्यामुळे नागरिक बाजारात येण्यासाठी भयभीत झाली आहे. परंतु या मोबाइल चोरींच्या तकरारी देवुन सुद्धा या अज्ञात चोरांना अद्याप पोलीस प्रशासन ने अटक केलेली नाही.विषेश म्हणजे आठवडी बाजाराच्या मध्यभागातुन मोबाइल चोरी होत आहेत.व या अज्ञात चोरांना पकडण्यासाठी आठवडी बाजारात पोलीस कर्मचारी-यांची ड्युटी सुद्धा लावण्यात आली होती परंतु पोलीस कर्मचारी बाजारात ड्युटी बजावत असतांना सुध्दा मोबाइल चोरीला जात आहे.त्यामुळे या चोरांसोबत बीट जमादारांचे काही अर्थिक देवान-घेवान आहे का असा प्रश्न नागरीकांच्या मनात उपस्थित झाला आहे.एव्हढेच नव्हेत तर महागांव बीट जमादार यांनी महागांव बीट चा पदभार स्विकारल्या पासुन महागांव शहरात चोरींच्या घटनेत दिवसेंदिवस वाढ होत आहे.त्यामुळे सदर बीट जमादार यांची महागांव बीट जमादार या पदावरुन बदली करण्यात यावी अशी मागणी जनतेकडुन केली जात आहे.
चौकट
युपीआय ट्रांजेक्शन ची माहिती देवुनही कार्यवाही करण्यास टाळाटाळ
मोबाइल चोरींच्या प्रकरणात तकरार कर्त्यांनी आपल्या मोबाइल मधील युपीआय द्वारे चोरांनी पैसे काढुन घेतल्याची माहिती पोलीसांना दीली व पैसे कुठे ट्रांसफर करण्यात आले याबाबतही पोलीस स्टेशन ला माहिती दीली परंतु आठवडा उलटुनही या प्रकरणात पोलीस प्रशासन कार्यवाही करण्यास टाळाटाळ करीत असल्याचा आरोप नागरिकांकडुन केल्या जात आहे.

