अरविंद बेंडगा
तालुका प्रतिनिधी, डहाणू
डहाणू :- डहाणू तलासरी महोत्सवाच्या तिसऱ्या दिवशी सांस्कृतिक कार्यक्रमांचे भव्य उद्घाटन विधानपरिषदेचे आमदार सचिन अहिर यांच्या हस्ते करण्यात आले,या सोहळ्यात डहाणू विधानसभा आमदार विनोद निकोले उपस्थित होते,यावेळी आमदार विनोद निकोले यांनी आपल्या भाषणात क्रीडा व सांस्कृतिक कार्यक्रमांचे महत्त्व विशद केलेत्यांनी सांगितले की, डहाणू तालुक्यातील विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळाच्या माध्यमातून लौकिक मिळवला आहे. विशेषतः नेपाळमध्ये आयोजित विठू दांडू स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचे त्यांनी कौतुक केले. तसेच, जिल्हा परिषद शाळेतील एका विद्यार्थ्याची मलेशियातील बेचकी स्पर्धेसाठी निवड झाल्याची आनंदवार्ता त्यांनी यावेळी दिलीग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे क्रीडा व सांस्कृतिक क्षेत्रातील योगदान मोठे असल्याने त्यांचे मनोबल वाढवण्यासाठी शुभेच्छा देत या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. महोत्सवात विविध कला, सांस्कृतिक सादरीकरणे व क्रीडाप्रकारांचे आयोजन
करण्यात आले आहे. प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभणाऱ्या या महोत्सवाने परिसरात आनंदोत्सवाचे वातावरण निर्माण केले आहे.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कमलेश राबड यांनी केले

