भरत पुंजारा
ग्रामीण प्रतिनिधी पालघर
डहाणू तालुक्यातील आगवन ग्रामपंचायतीस अदानी फाउंडेशनच्या वतीने रुग्णवाहिका भेट देण्यात आली. आपत्कालीन परिस्थितीत रुग्णांना वेळेवर वैद्यकीय मदत मिळावी, यासाठी ही मदत महत्त्वाची ठरणार आहे. या मोलाच्या योगदानाबद्दल ग्रामपंचायतीने अदानी फाउंडेशनचे सीएसआर फाउंडेशन हेड नित्यानंद तिवारी यांचे आभार मानले.
रुग्णवाहिका वेळेवर उपलब्ध झाल्यास गंभीर आजारी रुग्णांना तातडीने रुग्णालयात पोहोचवणे शक्य होते. ही गरज लक्षात घेऊन अदानी फाउंडेशनने आगवन ग्रामपंचायतीस रुग्णवाहिका प्रदान केली.
या कार्यक्रमास डहाणू विधानसभा आमदार श्री. विनोद निकोले, अदानी फाउंडेशन स्टेशन हेड श्री. राजेंद्र नंदी, अदानी फाउंडेशन सीएसआर फाउंडचे श्री. अविनाश फाटक, आगवन ग्रामपंचायत सरपंच श्री. रुपजी कोल तसेच ग्रामपंचायत सदस्य जयेश कोल आणि विलास उमतोल उपस्थित होते.
ही रुग्णवाहिका स्थानिक नागरिकांसाठी मोठी सुविधा ठरेल आणि भविष्यात आरोग्य सेवेसाठी उपयुक्त ठरणार आहे.

