पवन ठाकरे
ग्रामीण प्रतिनिधी संग्रामपुर
संग्रामपूर: संग्रामपूर तालुक्यातील पळशी झाशी येथे दिनांक ०७ फेब्रुवारी त्यागमूर्ती माता रमाई यांच्या १२७ वी जयंती च्या निमित्ताने सरपंच सौ. प्रियंका राहुल मिटांगे आणि उपसरपंच पंचफुलाबाई पवार, उपासक आणि उपासिका सर्वांनी माता रमाई ची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. आणि जे विहाराचे वॉल पुट्टी आणि कलरिंग चे काम राहुल भाऊ मेटांगे यांनी केले होते. त्यांचे पण आज शाल श्रीफळ देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले. सरपंच सौ. प्रियंका राहुल मिटांगे आणि उपसरपंच पंचफुलाबाई पवार यांचे पण शाल श्रीफळ देऊन समाजाच्या वतीने स्वागत आले. त्यांच्या या कार्याचा सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे.

