राजपाल बनसोड
तालुका प्रतिनिधी दिग्रस
दिग्रस : शहरातील वाल्मीक नगर जवळील दिग्रस आणि बायपास पुलाजवळ धावडा नदीच्या पात्रात एक तरुण दोन दिवसापूर्वी बुडाल्याची घटना घडल्याने शहरातील नागरिकांची नदीकाठी एकच गर्दी उसळली. दोन दिवसाच्या अथक प्रयत्नानंतर त्याचा मृतदेह थोड्या अंतरावर नदीच्या पात्रात तरंगताना दिसला. भूषण माणिकराव गावंडे( वय 30 वर्ष ) रा. दत्तनगर दिग्रस असे मृतकाचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार शहरातील दत्तनगर येथील भूषण गावंडे हा तरुण दोन दिवसापूर्वी नदीपात्रात बुडाला असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेता पोलिसांनी घटनास्थळी बोट व गोताखोरांच्या मदतीने दोन दिवस धावडा नदीत शोध कार्य राबविले, परंतु त्याचा सुगावा लागला नाही. शनिवार दिनांक 28 डिसेंबर रोजी सकाळी 7 वाजता घटनास्थळावरून काही अंतरावरच त्याचा मृतदेह तरंगताना दिसला. तेव्हा कुंदन खाडे व मोहम्मद परसूवाले सोबत सहकार्याने त्याला पाण्याबाहेर काढले. नेमका तू पाण्यात कसा पडला याबाबत अद्याप करू शकले नाही. याप्रकरणीय आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास पोलीस करीत आहे.

