सिध्दोधन घाटे
जिल्हा प्रतिनिधी बीड
बीड : दि.२९ डिसेंबर २०२४ परळी शहरातील स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी ४० हजाराचा गुटखा पकडल्याची बातमी वर्तमानपत्रातून प्रसिद्ध करण्यात परंतु बाकीचा गुटखा कुठे गेला याची माहिती पोलिसांनी प्रसार माध्यमांना दिली आहे का हा सगळ्यात मोठा प्रश्न उद्भवतो पोलिस अधिकारी साहेब परळी वैजनाथ शहरात हजारो रूपयांचा नाही तर लाखो रूपयांचा गुटखा रोज येतो.
बीड जिल्ह्यात खंडणी ,अपहरण, दरोडे, खुन,वाळू माफिया , महिलांवरील अत्याचार, यांच्या सह अनेक गुन्ह्यात वाढ झाली असून अवैध धंद्यांचा सुळसुळाट झाला असून बीडचे नवीन पोलिस अधीक्षक मनोज कॉवर यांच्यावर मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या खुनाच्या तपासाची जबाबदारी आली असून बीड जिल्ह्यातील गुन्हेगारीला जिल्ह्यातून हद्दपार करण्याचे मोठे आव्हान समोर आले आहे. नवीन पोलिस अधीक्षक जिल्ह्यात आले की त्यांना कामगिरी दाखवण्याचा बीड जिल्ह्यातील पोलिस प्रशासनाच्या हा नेहमीचाच धंदा नवीन काहीच नाही. बीड जिल्ह्यातील सामान्य नागरीकांना जिल्ह्यात मोकळा श्वास घेणे अवघड झाले असून परळी वैजनाथ येथील पोलिस प्रशासन ४० हजाराचा गुटखा पकडल्याची बातमी वर्तमानपत्रातून प्रसिद्ध करत आहेत बीड जिल्ह्यातील पोलिस प्रशासन नेहमीच कोणत्या ना कोणत्या घटनेतून चर्चेत येतेच ते काही नवीन नाही पण गेल्या दहा वर्षांत ज्या पध्दतीने जिल्ह्यातील पोलिस प्रशासनाकडून सामान्य जनतेची पिळवणूक होत आहे. ती अतिशय निंदनीय असून जिल्ह्यात कुठेही काहीही झाले की जिल्ह्यातील सामान्य माणूस पोलिस प्रशासना ऐवजी राजकीय पक्षातील गुंड प्रवृत्तीच्या नेत्यांच्या दारात जातात हा मागील दहा वर्षांपासून सुरू असलेला कारभार आहे. आणि हा मान्य करावाच लागेल मग बीड जिल्ह्यात कामकाज करून गेलेले पोलिस अधिकारी असोत किंवा कर्मचारी असोत. बीड जिल्ह्यातील पोलिस प्रशासनाच्या कारवाईतून गेल्या दहा वर्षात सामान्य नागरीकांना कधीच न्याय मिळाला नसल्याचे सामान्य जनतेतून मत येत आहे. जिल्ह्यातील अनेक पोलिस ठाण्यात निःपक्षपणे काम केले जात नसून आरोपी विरोधात गुन्हे नोंद होत नाहीत याउलट फिर्यादीची जात बघून गुन्हा नोंद करायचा का नाही हे ठरवले जाते ही सगळ्यात मोठी शोकांतिका आहे. हा प्रकार फक्त परळी वैजनाथ शहरात होत नसून बीड जिल्ह्यातील सर्व पोलिस ठाण्यात पोलिस प्रशासनाकडून होताना दिसतो. यामागील कारण म्हणजे जिल्ह्यात अवैध धंद्याबरोबर बोकाळलेला जातीयवाद आणि पोलिस खात्यातील जातीयवादी अधिकारी कर्मचारी त्याचबरोबर राजकीय पक्षातील जातीयवादी आणि गुंड प्रवृत्तीचे स्वयंभू नेते पुढारी तेव्हा पोलिस अधीक्षक साहेब परळी वैजनाथ येथील पोलिस प्रशासनाकडून ४० हजार रूपयांचा अवैध गुटखा पकडला यात नवीन आणि छाती फुगवून सांगण्यासारखे काहीच नाही. बीड जिल्ह्यातील पोलिस प्रशासनाच्या वर्दीला लागलेला डाग पुसण्याची जबाबदारी आज आपल्यावर आहे. तेव्हा बोलाचीच कडी आणि बोलाचाच भात या उक्तीप्रमाणे होऊ हीच बीड जिल्ह्यातील सामान्य जनतेची आपल्याकडून आपेक्षा आहे.

