सुधीर घाटाळ
ग्रामीण प्रतिनिधी डहाणू
डहाणू , जिल्हा परिषद शाळा गंजाड गॅलनपाडा येथे विद्यार्थ्यांना थंडीपासून संरक्षणासाठी B.B. Panthaki आणि J.R. Desai Foundation, Mumbai यांच्या वतीने स्वेटर वाटप करण्यात आले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून आला.
कार्यक्रमाला फाउंडेशनच्या संस्थापक हिताक्षी शहा देसाई आणि वृक्षद पंतखी हे मान्यवर उपस्थित होते. त्यांनी विद्यार्थ्यांना स्वेटर सोबत खाऊचेही वाटप केले. विद्यार्थ्यांनी मिळालेल्या स्वेटरमुळे आनंद व्यक्त केला.
कार्यक्रमादरम्यान हिताक्षी शहा यांनी शाळेतील शिक्षक व विद्यार्थ्यांशी संवाद साधला आणि शाळेच्या अडचणी समजून घेतल्या. त्यांनी, “भविष्यात शाळेच्या समस्यांवर तोडगा काढण्यासाठी आमचा ट्रस्ट निश्चितच मदतीसाठी पुढे येईल,” असे आश्वासन दिले.
या कार्यक्रमाचे समन्वयन शंकर आमटे यांनी केले, तर सूत्रसंचालन शंकर कुवरा यांनी केले. मान्यवरांचे आभार नीलम पाटील यांनी व्यक्त केले.
विद्यार्थ्यांसाठी केलेल्या या सामाजिक उपक्रमाने त्यांच्या मनात उत्साह आणि समाधानाचे वातावरण निर्माण केले आहे. अशा उपक्रमांमुळे शिक्षणासोबतच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला हातभार लागेल.