संजय डोंगरे ग्रामीण प्रतिनिधी माना
माना : येथे आज दिनांक २४ डिसेंबर रोजी शालेय स्तरीय अनवर उर्दू हायस्कूल व हबीबिया जुनिअर कॉलेज माना यांच्या मार्फत क्रीडा महोत्सव दिन हा साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक व प्राचार्य सय्यद वारसिक हुसेन हे होते. तर प्रमुख अतिथी म्हणून यु टीव्ही चॅनल चे पत्रकार उद्धव कोकणे व दैनिक अधिकार नामाचे ग्रामीण पत्रकार संजय डोंगरे हे उपस्थित होते. या कार्यक्रमात सदर महोत्सव शालेय क्रीडांगणात विविध खेळ, व सामने आयोजित करण्यात आले होते. त्यात हॉलीबॉल, खो खो, कबड्डी,लंगडी, प्रथम पाडीत लिंबू चमचे, संगीत खुर्ची, मंद गती सायकल स्पर्धा, इत्यादी सामने शालेय मुले व मुलीच्या व चमूप्रमाणे आयोजित करून सर्व खेळात विजयी मुला मुलींना प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित केले. क्रीडा महोत्सव हा दिवसभर राबविण्यात आला. या कार्यक्रमाचे आयोजन सय्यद मुजमील हुसेन, अध्यक्ष उर्दू एज्युकेशन सोसायटी माना यांच्या निदर्शनाखाली करण्यात आले होते. या कार्यक्रमाला शाळेचे प्राचार्य सय्यद वारसिक हुसेन यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाची आखणी व नियोजन करण्यात आले.