निलेश बा. किरतकार
मुख्य संपादक
अकोला : बाळापूर तालुक्यातील रिधोरा येथील विवाहितेने सासरच्या त्रासाला कंटाळून शनिवारी सकाळच्या सुमारास आपल्या राहत्या घरात फाशी घेऊन आपली जीवनयात्रा संपवली. याप्रकरणी बाळापूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. उमा अमोल तेलगोटे (रा. रिधोरा ता. बाळापूर) असे या विवाहितेचे नाव असून तिने सासरच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केली, असे तक्रारीत म्हटले आहे. मयताचा भाऊ सचिन वामन तांबरे (रा. विवरा ता. पातूर) याने या घटनेला मयताचे पती अमोल तेलगोटे आणि त्याचे सर्व कुटुंबीय जबाबदार असल्याचे तक्रारीत सांगितले. विवाहितेचे अंदाजे 15 वर्षापूर्वी अमोल तेलगोटे याच्याशी रीतिरिवाजाने विवाह संपन्न झाला होता. त्यांना एक मुलगा आणि एक मुलगी असे दोन अपत्ये आहेत. काही दिवस संसारगाडा सुरळीत सुरू होता. पण मागील काही दिवांपासून अमोल याचे एका महिलेशी अनैतिक संबंध आहेत. आणि त्याचे संपूर्ण पुरावे आमच्या कडे उपलब्ध आहेत, असे मुलीचे भाऊ सचिन यांनी सांगितले. याच महिलेला घेऊन पती अमोल हा आपल्या बहीण उमाचा छळ करीत होता. वारंवार तू दिसायला चांगली नाही, असे म्हणून अपमानित करीत होता. याच सर्व त्रासाला कंटाळून माझ्या बहीण या लोकांनी आत्महत्या करण्यास प्रवृत्त केले, असे भाऊ सचिन याने सांगितले.
काल दिवसभर पिडीतेचे कुटुंब बाळापूर येथील ग्रामीण रुग्णालयात न्यायासाठी एकच टाहो फोडत होते. या प्रकरणी फरार असलेल्या गुन्हेगारांना तात्काळ अटक करून, कठोर शिक्षा देण्यात अशी मागणी या वेळी कुटुंबीयांनी केली. वृत्त लिहेस्तोवर बाळापूर पोलिसात तक्रार दाखल करणे सुरू होते. पुढील तपास बाळापूर पोलीस स्टेशन चे ठाणेदार अनिल जुमळे यांच्या मार्गदर्शनाखाली बाळापूर पोलीस करीत आहेत.

