जलील शेख तालुका प्रतिनिधी,पाथरी
सख्या सासर्यानेच सुनेवर कोयत्याने सपासप वार करून आपल्या सुनेला मरणावस्थेत सोडले होते.या घटनेनंतर पाथरीत एकच खळबळ माजली होती. ही घटना पाथरी शहरात वाऱ्यासारखी पसरली होती. घटनेच्या दिवशी उलट सुलट चर्चा ही झाली. परंतु कारण अद्यापही गुलदस्त्यातच आहे. पाषाणहृदयी माणसातील माणुसकी किती आटत आहे याचे द्योतक आहे. असेच म्हणावे लागेल. काल कोयत्याने वार केल्याच्या घटनेनंतर डॉक्टरांनी त्या महिलेचे निकामी झालेले दोन्ही पाय व एक हात शस्त्रक्रिया करून धड़ा वेगळे केले. या घटनेत सदर महिला अत्यवस्थ असल्याने पोलिसांना जवाब घेता आला नाही.पत्नी, दोन्ही मुले कामानिमित्त घराबाहेर गेल्यावर शेख अमीन कालू याने मुलाच्या पत्नीवर कोयत्याने हल्ला केल्याची घटना सोमवार २३ डिसेंबर रोजी शहरातील महिपाल गल्लीत घडली होती. या घटनेनंतर रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या महिलेला प्रथम पाथरी व नंतर परभणी ला हलविण्यात आले होते. या घटनेत महिलेच्या दोन्ही पायावर, हातावर व डोक्यात कोयत्याने वार केले होते, हे वार एवढ्या क्रूरतेने केले होते की यात महिलेचे दोन्ही पाय व एक हात शरीराला लटकला होता. रात्री उशिरा डॉक्टरांनी त्या महिलेवर शस्त्रक्रिया केली यात महिलेचे दोन्ही पाय व एक हात धडापासून वेगळे करावे लागले. दरम्यान मंगळवारी गंभीर जखमी महिलेचा जवाब घेण्यासाठी पाथरी पोलिस गेले असता महिला अत्यवस्थ असल्याने जवाब घेता आला नाही यामुळे ही क्रूर घटना का घडली हे अजूनही कळू शकले नाही.

