संतोष पोटपिल्लेवार तालुका प्रतिनिधी, घाटंजी
घाटंजी: तालुका कृषी अधिकारी कार्यालय घाटंजी येथे संतोष डाबरे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यवतमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली आढावा बैठकी आयोजित करण्यात आली होते.यावेळी फळबाग लागवड बांबू लागवड तसेच कृषी विषयक विविध मुद्यावर बैठकित चर्चा झाली त्याच वेळी तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी कृषी विभाग निगडित समस्यांवर व्यस्था मांडली यात पीक विमा अनुदान,पी एम किसान योजनेत नाव टाकणे, पोकरा योजनेचा लाभ न मिळणे ,योजनेची जनजागृती अभाव शेतकरी कार्यशाळा न घेणे अतिवृष्टी अनुदान पासून शेतकरी वंचित फळबाग लागवड करून अनुदान न मिळणे महाडीबीटी अनुदान न मिळणे सिड फॉम् हाऊस बनले शेती फॉम् हाऊस कृषी कार्यलयात जागा अतिक्रम निरीष्ठा निकृष्ट दर्जाचे जसे बियाणे ,खते,औषधे, भाजीपाला लागवड किट, अतिशय निकृष्ठ दर्जाची असल्याची तक्रार पीक विमा कंपनी कार्यलय बंद अशा विविध समस्या घेऊन शेतकऱ्यांनी आपल्या समस्यांचा पाडा जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संतोष दाबरे तालुका कृषी अधिकारी समृद्धी वांगसकर यांच्या पुठे मांडल्या यावेळी रंजना बोबडे मंडळ अधिकारी गजानन दडवी, नरेंद्र डोळस, कृषी प्रवेक्षक सर्व कृषी सहाय्यक उपस्थित यावेळी शेतकरी अभिषेक ठाकरे, नारायण भोयर,आशिष भोयर, नितीन राठोड,राजू मानकर, प्रदीप राठोड, दिलीप खडसे व इतर शेतकरी हजर होते अनेक शेतकऱ्यांनी समस्या मांडल्या असता यावर जिल्हा अधीक्षक कृषी यांनी शेतकऱ्यांना मोन माळून नेल्याचे दिसले अनेक प्रश्ननावर त्यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही तेव्हा शेतकऱ्यांना खंत वाटली की शेतकऱ्यांच्या समस्या कोण सोडवणार याकडे लोकप्रतिनिधींनी लक्ष देणे गरजेचे आहे.असे शेतकऱ्यांना वाटत आहे.








