कुमारी.स्फूर्ती सुदर्शन गोवर्धन व
कुमारी.श्रुती केवळराम रोहनकर यांनी पटकावला प्रथम क्रमांक
सुदर्शन गोवर्धन
तालुका प्रतिनिधी सावली
दि.23/12/2024
सावली:सावली येथील रमाबाई आंबेडकर विद्यालय तथा कनिष्ठ कला महाविद्यालयाचे संस्थापक,अध्यक्ष दिवंगत.डॉ.वाय टी.गेडाम यांच्या 16व्या स्मृतीदिनानिमित्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती शिक्षण प्रसारक संस्था सावली द्वारा संचालित, रमाबाई आंबेडकर विद्यालय तथा कनिष्ठ कला महाविद्यालय आणि माऊंट विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय सावली द्वारा आयोजित वादविवाद स्पर्धेत व्याहाड बूज येथील इयता दहाव्या वर्गात शिकणारी नवभारत विद्यालयाची विद्यार्थिनी कुमारी स्फूर्ती सुदर्शन गोवर्धन व कुमारी.श्रुती केवळराम रोहनकर ह्यां दोघींनी प्रथम क्रमांक पटकाविला.सोमवार दिनांक 23डिसेबर सावली येथील “रमाबाई आंबेडकर” विद्यालय व कनिष्ठ कला महाविद्यालयाच्या प्रांगणात संपन्न झालेल्या स्पर्धेमध्ये स्फूर्ती व श्रुतीने हे यश संपादन केले आहे. सावली या ठिकाणी झालेल्या दिवंगत डॉ.वाय.टी.गेडाम यांच्या स्मृती दिनानिमित्त ही स्पर्धा घेण्यात आली असून अत्यंत उत्साहाने या स्पर्धेमध्ये सावली तालुक्यातील कापसी,निफंद्रा, व्याहाड खुर्द,व्याहाड बूज, विरखल ,अंतरगाव, पेंढरी मक्ता, पाथरी, लोंढोली, हरांबा, सावली, आदी विद्यालयाच्या अनेक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. “सोशल मीडिया समाजाला मदत करण्यापेक्षा नुकसानकारक आहे की नाही” या विषयावर घेण्यात आलेल्या वादविवाद स्पर्धेत स्फुर्ती व श्रुती ने दमदार भाषण देत प्रथम क्रमांक पटकाविला. या स्पर्धेत विजयी स्पर्धकांना प्रमाणपत्र, चषक,सन्मान चिन्ह व रोख पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक, शिक्षक व विद्यार्थी व मान्यवरांच्या उपस्थितीत सदर स्पर्धांचे पारितोषिक वितरण करण्यात आले. स्फूर्तीने व श्रुतीने प्राप्त केलेल्या प्रथम क्रमांकाबद्दल नवभारत विद्यालयाचे मुख्याध्यापक भगत सर, शाळा समिती अध्यक्ष , संस्था पदाधिकारी, सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी पालक व शिक्षणप्रेमी यांनी स्फुर्तीचे व श्रुतीचे मार्गदर्शक शिक्षक संतोष गावतुरे यांचे अभिनंदन केले आहे.








