परवेज जखुरा शहर प्रतिनिधी, महागांव
महागांव:महागाव तालुक्यातील कासोळा येथे सोमवारी २३ डिसेंबर रोजी दुपारी महसूल विभागाने अवैध गौण खनिज उत्खनन करुन वाहतूक करणाऱ्या एक टिप्पर व एक जेसीबी मशीनवर कारवाई केल्याचे दर्शवुन सविस्तरमाहिती अशी की काळी दौलत सर्कल मधील कासोळा येथे जेसीबीच्या सहाय्याने अवैध गौण खनिज उत्खनन करून टिप्परद्वारे वाहतूक करण्यात येत असल्याची गोपनीय माहिती महागाव चे तहसीलदार अभय मस्के यांना मिळाली. मिळालेल्या माहितीवरुन मंडळ अधिकारी गोविंद ठाकरे आणि त्यांचे पथक घटनास्थळी दाखल झाले व एक टिप्पर क्रमांक एम. एच. २७ एक्स ८७७५व एक जेसीबी मशीन क्रमांक एमएच २९ सिबी २२७० पथकाने पकडून जप्त करून महागाव तहसील कार्यालयात लावण्यात आले. या प्रकरणी महसूल विभागाकडुन जप्त केलेल्या वाहनांवर दंडात्मक कारवाई करण्याची प्रक्रिया मात्र विलंब लागत आहे. तहसील कार्यालयासमोर जेसीबी व टिप्पर जाप्त कारवाई करून ठेवले परंतु तिन दिवसांपासून दंडात्मक कारवाई साठी प्रक्रियेला विलंब का ? होत आहे या मुळे संशय निर्माण होत आहे जे.सि.बी व टिप्पर या वाहनावर होणारी मोठी दंडात्मक कारवाई टाळून महसूल विभाग आर्थिक वाटाघाटी तर करत नाही ना अशी चर्चा सुज्ञ नागरिकांमध्ये सुरू आहे जेसीबी सारख्या टिप्पर सारख्या वाहनावर मोठ्या प्रमाणात दंडात्मक कारवाई होऊ शकते महसूल विभाग दिरंगाई का करत आहे महसूल कर्मचारी अधिकारी यांच्याशी संपर्क साधला असल्यास हो कारवाई चालू आहे बस एवढेच ठराविक उत्तर मिळते.


