सिध्दार्थ कांबळे ग्रामीण प्रतिनिधी बिलोली
कुंडलवाडी शहरातील प्राथमिक आरोग्य केंद्रास दिनांक २१ डिसेंबर रोजी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.संगीता देशमुख यांनी भेट देऊन सर्व कामाची पाहणी केली आहे.कुंडलवाडी प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत २४ गावांसह कुंडलवाडी शहाराचा समावेश होतो.या प्राथमिक आरोग्य केंद्रात मोठ्या प्रमाणात रुग्णावर उपचार करून त्यांच्या आरोग्य संदर्भात अनेक उपक्रम राबविले जातात,याचा अनुषंगाने आरोग्य विभागाच्या वतीने शंभर दिवस क्षयरोगा संदर्भात मोहीम राबविण्यात येत आहेत या मोहिमेचा आढावा घेण्यासाठी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संगीता देशमुख, क्षयरोग अधिकारी डॉ.कोपूरवाड यांनी कुंडलवाडी प्राथमिक आरोग्य केंद्रास भेट देऊन विविध कामाची पाहणी केली आहे. यावेळी तालुका आरोग्य अधिकारी डॉ.गणपत वाडेकर,प्रभारी वैद्यकीय अधिकारी डॉ सारिका अनमूलवाड,कर्मचारी सी.एन. जाधव,अंगद मुंडे,गणेश जगताप,गादेवार मॅडम,नर्स वर्षा गंगाधर देवकांबळे,नर्स निता पडलवार,नर्स वर्षा पटेकर,जमराज सुनील,नितीन बागुलवार,औषध निर्माता महेश ठाकूर, माधुरी बोधनकर,तहसील बानू ,सेविका वंदना हेंगडे, माणिक गायकवाड, कदम दत्ताहरी,आदी सह मोठ्या प्रमाणात आरोग्य कर्मचारी व रुग्ण उपस्थित होते.








