पाणी समस्या,आरोग्य सुविधा,मूलभूत प्रश्नांनी वेधले अधिवेशनाचे लक्ष..
सिध्दार्थ कांबळे ग्रामीण प्रतिनिधी बिलोली
देगलूर बिलोली विधानसभा मतदारसंघातील पाणीपुरवठा,पायाभूत सोयीसुविधा,आरोग्यसेवा आणि प्रशासकीय अडचणींबाबत आ.जितेश अंतापूरकरांनी सभागृहात आवाज उठवत तातडीने ठोस उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.पाणी पुरवठ्याचा प्रश्न गंभीर – नव्या पाईपलाईनसाठी निधीची गरजदेगलूर नगरपालिकेचा पाणीपुरवठा कायमस्वरूपी सुरळीत करण्यासाठी करडखेड तलाव ते शहरांपर्यंत नव्याने पाईपलाईन टाकणे गरजेचे आहे. विद्यमान पाईपलाईन गळतीमुळे पाणीपुरवठा अपुरा होत आहे. त्यासाठी पर्याप्त निधीची तरतूद करण्याची मागणी करण्यात आली.पायाभूत विकास आराखडा तयार करण्याची गरज देगलूर,बिलोली,आणि कुंडलवाडी नगरपालिकांसाठी आधुनिक जीवनशैलीला अनुरूप विकास आराखडा तयार करून, शहर सौंदर्यीकरण,ड्रेनेज व्यवस्थापन,उद्याने, क्रीडा संकुल, नाट्यगृह, ग्रंथालय आणि जॉगिंग ट्रॅक यांसारख्या मूलभूत सुविधा विकसित करण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.प्रशासकीय कामकाजासाठी पूर्णवेळ मुख्य कार्यकारी अधिकारी नेमणूक अनिवार्यआहे.दरम्यान नगरपालिकांमध्ये प्रभारी मुख्यधिकारी अधिकाऱ्यांमुळे प्रशासकीय कामकाजात अडथळे येत असल्याने पूर्णवेळ अधिकाऱ्यांची नियुक्ती तातडीने करावी, अशी ठाम मागणी करण्यात आली आहे.आरोग्यसेवा सुधारणा – महिला रुग्णालय आणि ट्रॉमा केअर सेंटर आवश्यकमहिला रुग्णांसाठी विशेष सुविधा निर्माण करणे अत्यावश्यक असून, देगलूर शहरात स्त्री रुग्णालय आणि ट्रॉमा केअर सेंटरची उभारणी करण्याची मागणी करण्यात आली. तसेच, औषधांचा कायमस्वरूपी तुटवडा टाळण्यासाठी प्रभावी उपाययोजना करणे आणि शासकीय रुग्णालयांसाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देणे गरजेचे आहे.शासकीय रुग्णालयांचे अद्ययावतीकरणदेगलूर शहरात मंजूर १०० खाटांचे रुग्णालय निधीअभावी अद्याप कार्यान्वित झालेले नाही. त्याचे त्वरित अपग्रेडेशन करून कार्यान्वित करण्यासाठी तातडीने निधी मंजूर करावा, अशी आ.जितेश अंतापूरकरांनी केली आहे.आरोग्य कर्मचाऱ्यांच्या वेतन त्रुटी दूर करण्याचा आग्रह राज्य वेतन सुधारणा समितीच्या २०१७ च्या अहवालातील आरोग्य सहाय्यक/निरीक्षक पदांच्या वेतन त्रुटी दूर करून, त्यांच्या वेतनासंबंधित प्रश्न सोडवण्यासाठी सरकारने पुढाकार घ्यावा, अशी मागणी आ.अंतापूरकरांनी विधिमंडळ सभागृहात केले.मतदारसंघातील नागरिकांच्या मूलभूत गरजा भागविण्यासाठी प्रलंबित निधी मंजूर करणे आणि सर्व संबंधित यंत्रणांना कार्यप्रवृत्त करण्यासाठी शासनाने तातडीने पावले उचलावीत, असा ठाम मागणी आ.जितेश अंतापूरकरांनी हिवाळी अधिवेशन विधिमंडळात केले.चौकट..१)देगलूरला प्रादेशिक लाॅजिस्टिक हब मंजूर झाले असून या अनुंषगाने तात्काळ लाॅजिस्टिक हबमुळे देगलूरच्या विकासात भर पडेल त्यासाठी तात्काळ कार्यन्वित करण्यासाठी संबधितांना शासन निर्देश देण्याची विनंती आ.अंतापूरकरांनी अधिवेशनात केले.२)मतदारसंघातील जलजिवन योजनाच्या माध्यमातून चालू असलेले पाणीपुरवठ्याचे कामे अत्यंत ढिसाळ नियोजन पध्दतीने चालत आहेत दरम्याण संबधित अधिकार्यांची चौकशी करणे व दोषी कंञाटदारांना काळ्या यादीत टाकण्याचे मागणी यावेळी करण्यात आले.