विश्वास काळे उप जिल्हा प्रतिनिधी यवतमाळ
यवतमाळ: उमरखेड महागाव विधानसभेमध्ये नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये मतदार संघातील मायबाप जनतेने महायुतीचे उमेदवार किसनराव वानखेडे यांना भरभरून मतदान केले असून त्यांना विधानसभेमध्ये १७ हजाराच्या मताधिक्याने निवडून पाठविले. असताना देखील भाजपाला प्रकाश पाटलाची गरज का वाटत आहे. एकीकडे विधानसभेच्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीने तगडा उमेदवार दिला होता. धनशक्तीच्या जोरावर तो उमेदवार निवडून येईल असे चिन्ह दिसत असताना देखील भारतीय जनता पक्षाच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांनी प्रत्येक गावागावात गटातटामध्ये सग्या सोयऱ्यामध्ये वादविवाद करून भारतीय जनता पक्षाचे काम अतिशय प्रामाणिकपणे पार पाडले. आणि भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराला प्रचंड अशा धनशक्ती विरुद्ध जनशक्तीची ताकद दाखवून निवडून आणले असताना देखील पक्षश्रेष्ठीला ज्या प्रकाश पाटलावर वसंत सहकारी साखर कारखान्याची प्रचंड आरोप असताना सहकार क्षेत्रामध्ये त्यांनी केलेल्या भ्रष्टाचाराच्या विरोधामध्ये अनेक आरोप भारतीय जनता पक्षाच्या नेतेमंडळी व कार्यकर्त्यांनी केलेले आहेत. त्यामुळे प्रकाश पाटलाची भाजप सोबत वाढलेल्या जवळीकेमुळे कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड नाराजी दिसून येत आहे.