सिध्दार्थ कांबळे ग्रामीण प्रतिनिधी बिलोली
येथील शहर मराठी पत्रकार संघाची नुकतीच बैठक दिनांक २२डिंसेबर २०२४ रोजी मावळते अध्यक्ष सिध्दार्थ कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीत सर्वानुमते जेष्ठ पत्रकार दैनिक कुशल प्रशासकचे शहर प्रतिनिधी सुभाष गंगाधर दरबस्तेवार यांची अध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आलेली आहे. तर उर्वरित कार्यकारणी पुढील प्रमाणे उपाध्यक्ष पदी माजीद नांदेडकर,कार्याध्यक्षपदी रुपेश साठे, सचिवपदी सिध्दार्थ कांबळे,मार्गदर्शक पदी जेष्ठ पत्रकार एन.जी.वाघमोडे,सय्यद इस्ताकअल्ली तर सदस्य पदी हर्ष कुंडलवाडीकर,अमरनाथ कांबळे यांची सर्वानुमते निवड करण्यात आलेली आहे. यावेळी शहरातील पत्रकार बांधव उपस्थित होते. या नूतन कार्यकारणीचे सर्व स्तरातून स्वागत करण्यात येत आहे…