मधुकर बर्फे तालुका प्रतिनिधी पैठण
पैठण. छत्रपती संभाजी नगर रोडवर फारोळा येथील सागर वाईन शॉप परिसरात अड्डा आम्लेट वडापाव नाष्टा या नावाने अनेक हॉटेल चालू आहेत. हे हॉटेल दारू पिणारा चे आड्डे बनले असून या हॉटेल मधून दारू पिऊन येणारा वर बिडकीन पोलीसांनी २२ डिसेंबर रोजी सायंकाळी ५.४८ दरम्यान रोडच्या कडेला उभे असलेल्या मोटरसायकल धारकावर कारवाई केली त्याणा पोलीस पेट्रोलिंग गाडीमध्ये टाकून स्वतः हा पोलीस अधिकारी एपीआय निलेश शेळके यांनी व सोबत असलेले पोलीस कर्मचारी यांनी मोटरसायकल चालवत बिडकीन पोलीस स्टेशन येथे दाखल झाले. हॉटेलमध्ये व हॉटेल बाहेर असलेल्या मोटरसायकल चालकावर कारवाई न करता हॉटेल पासून दूर असलेल्या वर कार्यवाही करण्यात आली. परंतु जवळच असलेल्या हॉटेलधारकावर कार्यवाही केली नाही. या मागचे नेमके कारण काय असा प्रश्न सर्वसामान्य पडला आहे. दारू पिऊन गाडी चालविणे चालकास व इतरांसाठी धोकादायक आहे.कायदेशिर दंडात्मक कारवाई होने गरजेचे आहे.परतू अड्डा आम्लेट नाष्टा हॉटेल मध्ये खुले आम दारू मद्यपान केले जाते येथे सकाळ संध्याकाळ दारू पिणाराची गर्दी असते. या ठिकाणी दारू पिणारे ग्राहक वाईन शॉप मधून देशी विदेशी दारू घेऊन नामधारी नाष्टा हॉटेल मध्ये बसतात बिना परवाना हॉटेल मध्ये मद्यपान करून बेकायदेशीर आहे.तरी देखील सरास फारोळा येथील नाष्टा हॉटेल मध्ये परमीट रूम बियर बार परवाना असल्या सारखे हॉटेल चालक त्यांना सर्विस देतात त्यामुळे या परीसरात दारू पिऊन धिंगाणा घालनाराची संख्या वाढली असुन येथे हाणामारी वादविवाद अशिल शिवीगाळ भांडणे होतात.या सर्व गोष्टींचा फारोळा गावातील महीला व मुले ग्रामस्थ याना त्रास सहन करावा लागत आहे. हा सर्व प्रकार गेली अनेक दिवसांपासून चालू असुन. स्थानिक नागरिक या सर्व प्रकारामुळे हताश झाले आहे .याकडे प्रशासकीय यंत्रणेचे जाणिव पुर्वक दुर्लक्ष झाले असल्याचे दिसून येत आहे. नामधारी नाष्टा हॉटेल मध्ये चालू असलेला अवैध दारू मद्यपान व्यवसाय थांबेल का दारू बंदी विभाग, पोलीस प्रशासन यंत्रणा,अन्न व औषध प्रशासन अधिकारी गांभिर्याने लक्ष देऊन हॉटेल मध्ये चाललेला गैर प्रकारावर कार्यवाही करतीलका हॉटेल धारकासोबत काही लागेबांधे तर नाही ना असा प्रश्न स्थानिक नागरिकांना पडला आहे.