रवींद्र पवार तालुका प्रतिनिधी शिरूर
महाराष्ट्राच्या ख्यातनाम गायिका तसेच आपल्या आवाजाने गायन कोकीळा म्हणुन संपुर्ण महाराष्ट्र राज्यात प्रसिध्द असलेल्या कडूबाई खरात यांचा सणसवाडी ता.शिरूर नगरीत सन्मान करण्यात आला.यावेळी शिव फुले शाहू आंबेडकर चळवळीतील पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येंने उपस्थित होते.ख्यातनाम गायिका कडूबाई खरात या पुणे वरून छञपती संभाजीनगर (औरंगाबाद) कडे जाताना चहा पाण्यासाठी सणसवाडी नगरीत थांबल्या होत्या,त्याप्रसंगी येथील कार्यकर्तेंच्या वतीने त्यांचा सन्मान करण्यात आला.याप्रसंगी गायिका कडूबाई खरात यांनी सर्वांचे आभार मानून “आपण खातोत त्या भाकरीवर,बाबासाहेबांची सही हाय रं” हे गीत म्हणाल्या.उपस्थित सर्व कार्यकर्त्यांनी टाळ्या वाजवुन त्यांचे मनपुर्वक स्वागत केले.यावेळी मुस्लिम विकास परिषदेचे पुणे जिल्हाध्यक्ष रिजवान बागवान,कोरेगाव भिमा विजय रणस्तंभ संघाचे शिरूर तालुकाध्यक्ष तात्यारा़म मोरे,युवारत्न सामाजिक संघटनेचे सचिव भास्कर मोरे, तिसरो दळ गोर बंजारा समाज ग्रुप महाराष्ट्र राज्य चे संस्थापक अध्यक्ष गोर सेना पुणे जिल्हा सचिव रविंद्र पवार,महाराष्ट्र राज्य श्रमिक महासंघाचे खजिनदार विकास दरेकर, तिसरो दळ राष्ट्रीय उपाध्यक्ष रणजित भाऊ पवार,इंद्रजित लांडगे,गोरसेना शिरूर तालुकाध्यक्ष अक्षय पवार,रोहन जाधव,राहुल आडे,अक्षय जाधव,रोहित जाधव,ज्ञानेश्वर चव्हाण,गोलू राठोड,शुक्रराज चव्हाण आदि.पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येंने उपस्थित होते.


