अनिल तांबे राजेंद्र गायकर ग्रामीण प्रतिनिधी जुन्नर
जुन्नर: शालेय जीवनातील स्पर्धा परीक्षा म्हणजे भावी काळातील स्पर्धा परीक्षांची नांदी आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांनी शालेय जीवनापासूनच तयारी करावी,”अशा आशयाचे प्रतिपादन अनिल तांबे यांनी येथील एन एम एम एस परीक्षा केंद्राचे उदघाटन करताना केले. चैतन्य विद्यालयात आज ग्रामविकास मंडळ ओतूर या संस्थेचे अध्यक्ष अनिल तांबे यांचे हस्ते परीक्षा केंद्राचे उदघाटन करण्यात आले. यावेळी सर्व परीक्षार्थींना शुभेच्छा देताना त्यांनी वरील आवहन विद्यार्थ्यांना केले. या परीक्षेविषयी अधिक माहिती देताना स्पर्धा परीक्षा विभागाचे प्रमुख भाऊसाहेब खाडे म्हणाले की,”भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयाच्या वतीने आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकांकरिता शिष्यवृत्ती योजना (एन एम एम एस) ही परीक्षा दरवर्षी डिसेंबर महिन्यात घेतली जाते. ज्या पालकांचे उत्पन्न साडेतीन लाखापेक्षा कमी आहे, अशा पालकांच्या पाल्यांना या परीक्षेला बसता येते. महाराष्ट्राकरता जवळजवळ ११६०० जागांसाठी चा कोटा शिष्यवृत्तीसाठी आहे. शिष्यवृत्ती प्राप्त विद्यार्थ्याला पुढील चार वर्षांकरिता प्रत्येकी रुपये १२००० शिष्यवृत्ती मिळते. शिवाय कुणबी मराठा या विद्यार्थ्यांना सारथी शिष्यवृत्ती सुद्धा या मार्फतच मिळते. यावर्षी चैतन्य विद्यालयात एकूण ३८८ परीक्षार्थी एकूण १९ विद्यालयांमधून प्रविष्ट झाले आहेत.यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष प्रभाकर तांबे, राजेंद्र डुंबरे, रघुनाथ तांबे, प्रदीप गाढवे, पंकज घोलप, मुख्याध्यापिका व केंद्र संचालिका राजश्री भालेकर, संजय हिरे, प्रमोद जाधव,योगेश गाढवे, संतोष सोनवणे, दत्तात्रेय गाडेकर,रूपाली आवारी, महादेव डिसले,अनिल जवरे, दिनेश ताठे,लक्ष्मण दुडे, सारिका नलावडे, डी .डी. पाटील, बी.जी. दाभाडे, एल.बी.गोडे, आर व्ही कांबळे, एम एन इनामदार, व्ही एस भांगे, बी.पी. काशीद,विजय खरात,सोनाली कांबळे, तनुजा थोरात ,हर्षल शितोळे, प्रसन्न तांबे,अरविंद आंब्रे, शिक्षक बंधू भगिनी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भाऊसाहेब खाडे यांनी तर प्रस्ताविक प्रमोद जाधव यांनी केले. अनिल जवरे यांनी आभार मानले.


