( केंद्रस्तरीय खेळ व क्रीडा महोत्सव उद्घाटन प्रसंगी उपसरपंच प्रल्हाद राठोड यांचे प्रतिपादन )
राजपाल बनसोड तालुका प्रतिनिधी दिग्रस
दिग्रस : मोबाईल आणि सोशल मीडियाच्या आधुनिक युगात खेळाचे महत्व कमी होत चाललेले आहे. परंतु खेळ आपल्याला शिस्त आणि चिकाटी शिकवतो म्हणूनच प्रत्येक विद्यार्थ्याने कोणत्या ना कोणत्या खेळात सहभाग घेतला पाहिजे. मोबाईल मध्ये अडकून न पडता अभ्यासाबरोबर खेळाचाही छंद जोपासला पाहिजे. असा सल्ला प्रल्हाद राठोड उपसरपंच महागाव यांनी कलगाव केंद्रस्तरीय क्रीडा महोत्सव उद्घाटन प्रसंगी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना दिला. उद्घाटन प्रसंगी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सुखदेव बोडके यांनी वेळ व शिक्षण एकाच नाण्याच्या दोन्ही बाजू असून खेळाशिवाय शिक्षण असू शकत नाही. खेळातून मुला मुलींचा सर्वांगीण विकास होतो. ग्रामीण भागात जिल्हा परिषदेच्या शाळा खेळ व शिक्षण यांची सांगड घालून मुलांना उत्तम रीतीने घडविण्याचे कार्य आमच्या जिल्हा परिषदेचे गुरुजी करतात. याबाबत समाधान व्यक्त केले. यावेळी महागाव ( पलाट ) शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अजेंद्र वाघमारे तसेच प्रल्हाद गावंडे हजर होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक कलगाव शाळेचे मुख्याध्यापक संजय कुकडे यांनी केले तर सूत्रसंचालन दत्तात्रय गावंडे यांनी केले. व आभार प्रदर्शन नासिर बेग यांनी केले. यावेळी कलगाव केंद्रातील सर्व जिल्हा परिषद शाळेचा उत्स्फूर्त सहभाग व प्रतिसाद माननीय गिरीश दूध हे केंद्रप्रमुख यांच्या नियोजनानुसार व मार्गदर्शनाखाली मिळाला. दिवसभर 6 ते 11 व 11 ते 14 वयोगटातील सर्व मुलींच्या सांधिक व वैयक्तिक स्पर्धा अतिशय खेळ भावनेतून संपन्न झाल्यात. मैदान प्रमुख म्हणून विद्या निमकर,नासिर बेग, सागर गुजर, सुरेश राठोड यांनी काम पाहिले, तर पंच,गुण,लेखक आणि वेळाधिकारी म्हणून उमेश जाधव,दिगंबर वंडे, निश्चित मॅडम, श्रद्धा मॅडम, राऊत, इरतकर, चांदेकर, आडे, दुधे,संगीता मॅडम यांनी काम पाहिले. मुलांच्या क्रीडा स्पर्धा व कब बुलबुल मेळावा यांचे आयोजन असल्यामुळे आनंदमय वातावरण तयार झाले होते. आयोजक महागाव शाळेच्या मुख्याध्यापिका सुचित्रा दुधे व क्रीडा सचिव जितेंद्र वाघमारे यांनी सर्व व्यवस्था चोख रीतीने सांभाळली.


