गणेश वाळुंज
ग्रामीण प्रतिनिधी आंबेगाव
आंबेगाव : भारतीय मजदूर संघ 70 व्या वर्षात पदार्पण करत असल्याच्या निमित्ताने 1 डिसेंबर ते 20 डिसेंबर प्रत्येक जिल्ह्यात वीज कंत्राटी कामगारांना भेटून संवाद,चर्चासत्र,मीटिंग मेळाव्याच्या माध्यमातून कांमगारांच्या बारीक सारीक समस्यां जाणून घेत कामगार कायद्याची जनजागृती करण्यात येणार आहे.कंत्राटदार विरहित कामगार हरियाना पटर्न तिन्ही वीज कंपनीत नक्कीच लागू होईल या साठी तिन्ही वीज कंपनीतील सर्व वीज कंत्राटी कामगारांनी एका झेंड्या खाली एकत्र येत संघर्ष करावा लागेल असा ठाम विश्वास मा.अण्णा देसाई यांनी विश्वकर्मा भवन पुणे येथे झालेल्या प्रदेश कार्यकारिणी च्या बैठकीत व्यक्त केला.प्रत्येक जिल्ह्यात होणाऱ्या संपर्क अभियान मेळाव्यात सर्व कामगारांनी सहभागी व्हावे असे आवाहन संघांचे अध्यक्ष निलेश खरात यांनी केले. या वेळी मंचावर जेष्ठ मार्गदर्शक मा.अण्णा देसाई,सुभाष सावजी, शरद संत, सरचिटणीस सचिन मेंगाळे,पुणे जिल्हा अध्यक्ष अर्जुन चव्हाण, कोषाध्यक्ष सागर पवार, संघटनमंत्री उमेश आनेराव व उपमहामंत्री राहुल बोडके उपस्थित होते. या मीटिंग साठी 26 जिल्ह्यातील महावितरण महापारेषण व महानिर्मिती चे प्रमुख पदाधिकारी उपस्थित राहिले होते. सदरील बैठक यशस्वी करण्यासाठी पुणे जिल्हा पदाधिकारी निखिल टेकवडे,सुमीत कांबळे यांनी महत्वपूर्ण योगदान दिले.