कैलास श्रावणे
तालुका प्रतिनिधी पुसद
कार्यकर्त्यांकडून केदारलिंग पांढूर्णा येथील महादेवाला साकडे नाईक परिवाराचा वारसा जनसेवेचा यवतमाळ जिल्ह्यातील १९५२ पासुन आजपर्यंत पुसद विधानसभा मतदार संघात सर्वाधिक काळ मुख्यमंत्री पदावर राहणारे वसंतराव नाईक ते आजपर्यंत इंद्रनिल नाईक यांच्या पर्यंत आमदारकीचा हा अभेद असणारा बालेकिल्ल्ला आज देखील कायम आहे. विदर्भामध्ये पहिल्या तर राज्यात चौथ्या क्रमांकावर मताधिक्य मिळविणाऱ्या इंद्रनिल नाईकांना आता मंत्री पद मिळण्याच्या हालचाली सुरु झाल्या असल्याच्या बातम्या जिल्ह्यात पसरत आहेत. अश्यातच पुसद येथील नाईकांच्या कार्यकर्त्यांनी केदारलिंग पांढूर्णा च्या महादेवाचा दुधाभिषेक करून इंद्रनिल नाईक मंत्री व्हावेत असे साकडे घातले आहे. तब्बल ९२ हजाराच्या मताधिक्य जिल्ह्यात आजपावतो कुणालाही मिळाले नाही त्यातच नाईक परिवाराने आजपर्यंत केलेली जनसेवा , माजी मंत्री मनोहर नाईक यांचा आशीर्वाद , आणी आमदार इंद्रनिल नाईक व त्यांच्या अर्धांगिनी यांची जनतेविषयी असलेली तळमळ यामुळे मताधिक्य मिळाल्याचे बोलल्या जात आहे. ५ डिसेंबर रोजी होणाऱ्या आझाद मैदान मुंबई येथे शपथविधिमध्ये पुसदचे आमदार इंद्रनील नाईक यांना मंत्रिपद मिळावे याकरिता केडार्लिंगाचे दुधाभिषेक करून साकडे घातले यावेळी ऍड. सुनिल ढाले , प्रशांत गडदे , पुंजाजी काईट , सुखदेव बोडखे तथा भक्तगण उपस्थित होते.