राष्ट्रीय जंतनाशक दिनानिमित्त विद्यार्थ्यांनी केले जंतनाशक गोळ्याचे सेवन
प्रशांत सूर्यवंशी
तालुका प्रतिनिधी तळोदा
तळोदा : तळोदा येथील अ. शि. मंडळ संचलित सावित्रीबाई फुले प्रणित श्री सुपडू वना माळी प्राथमिक विदयामंदिर येथे दि 4 डिसेंबर रोजी राष्ट्रीय जंतनाशक दिनानिमित्त शाळेतील इयत्ता पहिली ते चौथीच्या सर्व विद्यार्थ्यांना शिक्षकांच्या देखरेखित जंतनाशक गोळ्या वाटप करण्यात आल्या.केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनानुसार राष्ट्रीय जंतनाशक दिन मोहीम अंतर्गत 4 डिसेंबर रोजी राष्ट्रीय जंतनाशक दिन साजरा करण्याचे आवाहन करण्यात आले होते. सदरील सूचनेनुसार काल दि 4 डिसेंबर रोजी शाळेतील इयत्ता पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांना जंतनाशक गोळ्या देऊन मुख्याध्यापिका वंदना माळी यांच्या सूचनेनुसार सर्व शिक्षकांच्या देखरेखित विद्यार्थ्यांनी गोळया सेवन केल्यात.केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार राष्ट्रीय जंतनाशक दिन मोहिम दि 4 डिसेंबर राष्ट्रीय जंतनाशक दिन व 10 डिसेंबर रोजी मॉप अप दिन राज्यातील 16 आदिवासी जिह्यामध्ये राबवायची आहे. त्यातील पहिला टप्पानुसार शाळेतील उपस्थित विद्यार्थ्यांना जंतनाशक गोळ्या (अलबेन्डोझॉल) देण्यात आल्या.जंताचा बालकाच्या आरोग्यावर होणारा परिणाम रक्तक्षय ,पोटदुखी, उलट्या, अतिसार ,भूक मंदावणे कुपोषण ,थकवा ,पोटाला सूज येणे जंताचा नाश केल्याने बालकांना होणारे फायदे रक्तक्षय (अनेमीया ) कमी होतो ,शाळेतील उपस्थिती नियमित होते ,बालक क्रियाशील बनते,रोगप्रतिकारक शक्ती वाढते ,शारीरिक व बौद्धिक वाढ सुधारते ,आरोग्य चांगले राहते.