मोहन कांबळे
ग्रामीण प्रतिनिधी मालेगांव
मालेगांव : तालुक्यातील राजुरा येथे जिल्हा परिषद शाळेत उत्सव समतेचा हा कार्यक्रम स्वयम् शिक्षण प्रयोग या संस्थे मार्फत मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला.या वेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष राजुरा ग्रामपंचायत चे सरपंच अजित राजूरकर, प्रमुख पाहुणे पोलीस पाटील डॉ धनंजय राजूरकर,ग्राम पंचायत सदस्य मोहन कांबळे,अशा वर्कर रेखाताई सोनोने ,वंदनाताई हिवराळे,अंगणवाडी सेविका शोभाताई अढाव,अनुपमाताई आहळे ,शोभाताई उगले,सुमन मोहळे ,वर्ग शिक्षिका कल्पनाताई क्षिरसागर ,वर्गशिक्षक उत्तम खोडके ,संतोष नगरे,संतोष वाळले,देवसिंग पडवाल,स्वयम् शिक्षणं संस्थेच्या वतीने राधाताई कालापाड,यांनी प्रास्ताविक भाषणात संस्थेची माहिती स्थापना संस्थेचे कार्य याची पद्धतशिर माहिती दिली .स्वयंम् शिक्षण प्रयोग ही संस्था ग्रामीण भागात १९९३ पासून कार्यरत आहे.संस्था सात राज्यात महाराष्ट्र,केरळ ,बिहार,ओडिसा, आसाम,कर्नाटक ,गुजरात,३२७४ पेक्षा अधिक गावामध्ये शाश्वत, शेती ,पोषण ,आरोग्य ,पाणी, स्वच्छता , उद्योजकता,विकास या विषायास अनुसरून कार्यरत आहे.मालेगांव तालुक्यातील ५० गावे वाशिम तालुक्यातील ५० गावे असे ऐकून १०० गावामध्ये १० हजार महिला ६००० हजार शाळेतील विद्यार्थी सोबत स्त्री _ पुरुष समानता,पाणी आरोग्य ,पोषण,आणि स्वच्छता ,तसेच सेंद्रिय शेती ,गावं कृतीगट बळकटिकरण ई विषयावर काम करीत आहे.ग्रामपंचायत ला सोबत घेऊन लोक सहभागातून ग्राम आराखडा तयार करणे. राजुरा येथील जिल्हा परिषद शाळेला १ लाख ५० हजार रु निधी या संस्थे मार्फत उपलब्ध करून दिला आहे.याची माहिती प्रास्ताविक माहिती संस्थे च्या वतीनी राधाताई ने उपस्थित महिला गावकरी मंडळी यांना दिली.उत्सव समतेचा हा कार्यक्रम गावातून भव्य मिरवणूक काढण्यात आली. व महिलांच्या आणि विद्यार्थांच्या अनेक स्पर्धा आयोजित करण्यात आल्या .निबंध स्पर्धा,रांगोळी स्पर्धा,खुल जा सिम सिम ,अडथळ्यांची शर्यत अशा विविध प्रकारच्या स्पर्धा आयोजित केल्या होत्या.तसेच भरोड ,लोकगीते, कलापथक ,च्या माध्यमातून स्वच्छता, अभियान सार्वजनिक वैकतिक स्वच्छता , ई माहिती चा संदेश या कार्यक्रमाअंतर्गत देण्यात आला. स्वयम् शिक्षण प्रयोग संस्थे च्या वतीने कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी राधाताई, कालापाड,संजीवनी पडघान,अश्विनी पंडित,यांनी कार्यक्रमाचे आयोजन नियोजन व परिश्रम घेतले.व तसेच आभार राधिका चिमणकर यांनी केले.