कैलास शेंडे
जिल्हा प्रतिनिधी नंदुरबार
नंदुरबार:तळोदा- येथील सर्वात रहदारीचा रस्ता असलेल्या स्मारक चौकात पाच वाजे दरम्यान एका अवजड वाहनाच्या गियर अडकल्याने ते वाहन जागेवरच बंद पडले त्यामुळे वाहनाची व मोटरसायकलींची एकच गर्दी उडाली.
सविस्तर वृत्त असे की काल सायंकाळी पाच वाजेदरम्यान एक अवजड वाहन मेनरोड नंदुरबारकडून स्मारक चौकाकडे येत होते परंतु स्मारक चौक हाकेच्या अंतरावर राहते तोवर त्या अवजड वाहनाच्या गिअर अडकल्याने जागेवरच बंद पडले. ज्या जागेवर वाहन बंद पडले ती जागा आधीच अरुंद असल्यामुळे एकच मोटारसायकल त्या वाहनाच्या बाजूने निघत होते. त्यामुळे दोन्ही बाजूने येजा करणाऱ्या वाहनांची रांग लागली. स्मारक चौक व आजूबाजूला चारचाकी वाहने व मोटरसायकल यांची कोंडी झाली.आधीच खराब रस्त्याने व धुळीने त्रस्त असलेल्या तळोदेकरांना दुष्काळात तेरावा महिन्याची जाणीव झाली.या दरम्यान मेकॅनिकला बोलवून जागेवरच बंद पडलेल्या अवजड वाहनाची दुरुस्ती करण्यात आली. सुमारे तासाभरानंतर वाहन दुरुस्त झाल्याने वाहतूक सुरळीत झाली. नंदुरबार कडून येणारे वाहने ही संत सावता चौक येथूनच मरिमाता मंदिर मार्गे एमएसईबी च्या मागून शहादा रस्त्यावर येत होती.परंतु तो रस्ता मागील महिनाभरापासून खोदून ठेवल्याने अवजड वाहनांची वाहतूक ही मुख्य रस्त्यावरून होतं आहे. त्यातच अशी एखादी घटना घडल्यामुळे संपूर्ण शहरांत वाहतूक खोळबित होते. यावर उपाययोजना करण्याची मागणी लोकांमध्ये जोर धरू लागली आहे.