शरद भेंडे
तालुका प्रतिनिधी अकोट
अकोट : तालुक्यातील पिप्री खुर्द येथील घटना. टू व्हीलर वाचवायच्या नादात ट्रॅक्टर गेला रोड च्या खाली ही घटना अडगाव ते पिंप्री खुर्द रोड वर घडली हे अंतर 5की.मी.असून त्या रस्त्यावर दुतर्फा काटेरी झुडपे वाढली असुन संबंधित विभागाने लक्ष देउन हे झुडपे काढण्याची मागणी वाहन चालक करीत आहे.काही ठिकाणी ही झुडपे मोठ्या प्रमाणावर वाढली असुन रोडच्या मधोमध पर्यंत पसरली आहेत.तेथुन वाहन चालवताना समोरील वाहने दिसत नसल्यामुळे बरेचदा किरकोळ अपघात ही झाले आहेत.हा रस्ता प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेत तीनवर्षापुर्वी तयार करण्यात आला परंतु अजुनपर्यंत रोडच्या साईडचे दीडमीटर पट्टीवर मुरुम टाकण्याचे काम बाकी असल्याने रोडच्या दोन्ही साईडवर गवत वाढले असुन काटेरी झुडपांचाही विळखा पडलेला आहे,एवढ्या वर्षात केवळ 2 कि.मि थातुरमातुर झुडपे तोडण्यात आली.तेव्हापासुन या रोडकडे संबंधीत विभागाचे अर्थपुरण दुर्लक्ष आहे. झुडपे दोन्ही साईडला बेसुमार वाढल्यामुळे बरेच ठिकाणी विरूद्ध दिशेने येणारे वाहन दिसत नसल्यामुळे अपघात होण्याची शक्यता आहे,तसेच वाहन चालवताना चालकाला तारेवरची कसरत करावी लागत असुन विरूद्ध दिशेने येणारे वाहनाला साईड देतांना प्रवाशी वाहनामधील मधील प्रवाशांना या काटेरी झुडपांचे फटके बसत किरकोळ ईजा होत आहे.हा रस्ता आदिवासी भागात जोडला गेला आहे तरी संबधीत विभागाने ही काटेरी झुडपे लवकरात लवकर काढावे अशी मागणी पिंप्री खुर्द सह परीसरातील वाहन चालक करीत आहेत








