रितेश टीलावत
जिल्हा प्रतिनिधी अकोला
पश्चिम विदर्भातील नीट आणि जेईई मध्ये सर्वोत्कृष्ट निकाल देणारे व मागील 30 वर्षापासून अविरत सेवेत असणारे अकोला येथील प्रशांत देशमुख सरांच्या सरस्वती कोचिंग क्लास मध्ये 1 डिसेंबर 2024 रोजी सेट परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते . सदरहू परीक्षेत अकोला अमरावती वाशिम यवतमाळ बुलढाणा या पाच जिल्ह्यातून जवळपास 2200 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. या परीक्षेत प्रथम पंचवीस विद्यार्थ्यांना शंभर टक्के ट्युशन फी मध्ये स्कॉलरशिप देण्यात येणार असून आयआयटी एम्स चे एज्युकेशन टूर ,सफर दिल्या जाईल. तसेच एप्पल कंपनीचे लॅपटॉप , अँड्रॉइड मोबाईल चे वाटप सुद्धा विद्यार्थ्यांना करण्यात येणार आहे. पालक व विद्यार्थ्यां करीता वर्चुअल रियालिटी व्ही. आर. चे मोफत प्रात्यक्षिक देण्यात आले. वर्चुअल रियालिटी चे प्रात्यक्षिक पाहून पालकानी सरस्वती कोचिंग क्लासेसची प्रशंसा केली. विद्यार्थ्यांच्या उज्वल भविष्याकरिता सरस्वती कोचिंग क्लासेस संचालक प्रशांत देशमुख सर यांनी अमूल्य मार्गदर्शन यावेळी केले.